नाशिक रोडला दगडफेक; परिस्थिती वेळीच नियंत्रणात

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी नाशिक रोडला दगडफेक; काही काळ वातावरण तणावपूर्ण
Stone throwing at Nashik Road
Stone throwing at Nashik RoadStone throwing at Nashik Road

नाशिक रोड : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने बुधवार (ता. १४) रात्री आठनंतर संचारबंदी लागू केली. याचदरम्यान नाशिक रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे कार्यक्रम झाल्यानंतर गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगविताना काही समाजकंटकांनी पोलिसांच्या दिशेने दगड फेकले. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते.

पोलिसांच्या दिशेने दगडफेक

परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवसभरात उत्साहात व शिस्तबद्धपणे साजरी झाली. मात्र, संचारबंदीचे पालन करण्याचा आग्रह केल्यामुळे रात्री नऊच्या सुमारास काही समाजकंटकांनी आंबेडकर पुतळा परिसरात पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. जयंती समितीचे पदाधिकारी, पोलिस यांच्या संयुक्त प्रयत्नामुळे परिस्थिती वेळीच नियंत्रणात आली. दगडफेकीत कोणी जखमी झाले नाही. शासनाने कोरोनाचे संकट असल्यामुळे काही नियम घालून दिले होते. त्याचे पालन करून पदाधिकाऱ्यांनी रात्री वेळीच कार्यक्रम आटोपते घेतले.

समाजबांधवांमध्ये धावपळ

पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप केल्याने थोड्याच वेळात शांतता झाली.सकाळपासून समाजबांधव दिवसभरात कुटुंबासह टप्प्याटप्प्याने येऊन अभिवादन करून निघून जात होती. अभिवादनासाठी येणाऱ्या समाजबांधवांना रात्री साडेआठनंतर जमावबंदीचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी व जयंती उत्सव समितीने केले. समाजबांधवांनी त्यांना प्रतिसाद दिला. आपल्या वाहनाने व पायी ते घरी निघाले. पावणे नऊच्या सुमारास मोठा जमाव आंबेडकर पुतळ्याच्या दिशेने येत होता. पोलिसांनी त्यांना संचारबंदी व जमावबंदी असल्याने माघारी फिरण्याची विनंती केली, त्यातील काही समाजकंटकांना राग आला. त्यांनी दगडफेक सुरू केल्याने घरी जाणाऱ्या समाजबांधवांमध्ये धावपळ उडाली. पोलिसांनी समाजकंटकांचा पाठलाग केला, ते सैरावैरा पळून गेले. शिवाजी पुतळ्यापर्यंत पोलिस आणि समाजकंटक यांच्यात संघर्ष सुरू होता. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. सहाय्यक पोलिस आयुक्त समीर शेख, वरिष्ठ निरीक्षक सूरजकुमार बिजली यांनी जयंती समितीचे संयोजन समितीने सहकार्याने शांततेचे आवाहन केले. नाशिक रोड व उपनगर पोलिसांनी राज्य राखीव पोलिस दल, जयंती समितीचे पदाधिकाऱ्यांनी सयुंक्त मोहीम करत शांतता प्रस्थापित केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com