बालकामगार ठेवल्यास दंडात्मक कारवाई होणार

बालकामगार ठेवल्यास दंडात्मक कारवाई होणार
Published on: 
बालकामगार ठेवल्यास दंडात्मक कारवाई जिल्हा कामगार अधिकारी मधुरा सूर्यवंशी यांची माहिती नंदुरबार, ता. १८ : बालकामगार कामावर ठेवल्यास व्यावसायिक व आस्थापनांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल. यात २० ते ५० हजारांपर्यंत दंड तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा कामगार अधिकारी मधुरा सूर्यवंशी यांनी दिला. बालमजुरीच्या समस्येला आळा घालण्यासाठी आणि बालकांच्या हक्कांचे संरक्षणासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासनातर्फे विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात २० नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात बालकामगार प्रथा विरोधी सप्ताह साजरा होत आहे. सप्ताहाच्या माध्यमातून बालमजुरीविरोधात जनजागृती करण्यासोबतच बालकांना कामावर ठेवणाऱ्या व्यावसायिक व आस्थापनाचालकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. १४ वर्षांखालील बालकांना कोणत्याही आस्थापनेत कामावर ठेवणे हा गुन्हा आहे. तसेच १४ ते १८ वयोगटातील किशोरवयीन बालकांना धोकादायक उद्योग व प्रक्रियांमध्ये कामावर ठेवणे फौजदार गुन्हा आहे. बालकामगार आढळल्यास संबंधित बालकाची कामातून मुक्तता करून मालकाविरुद्ध संबंधित पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येईल. दोषी मालकास सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा किंवा किमान २० हजार ते कमाल ५० हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास एक ते तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते किंवा १० हजारांचा दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकते. जिल्ह्यातील दुकाने, हॉटेल, विविध आस्थापना, वीटभट्ट्या, खडीक्रशर, चहाच्या टपऱ्या आदी ठिकाणी बालकामगारांना कामावर ठेवू नये. बालकांचे बालपण सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. किशोरवयीन बालकास प्रतिबंधित पद्धतीने कामावर ठेवल्याचे आढळल्यास सरकारी कामगार अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, कामगार उपआयुक्त मधुरा सूर्यवंशी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.