दिवाळीत भेसळ थांबवा,

दिवाळीत भेसळ थांबवा,
Published on: 
NSK26H33582 जळगाव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निवेदन देताना उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम, ललित शर्मा आदी. ----------- खाद्यपदार्थांमधील भेसळ थांबवा; अन्यथा आंदोलन ‘मनसे’ची दिवाळीच्या पार्श्र्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २६ : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील हॉटेल्स, मिठाईची दुकाने, खाद्यपदार्थ विक्री केंद्रे, शीतगृहे, गोदामे व अन्नपदार्थ उत्पादन केंद्रांची विशेष तपासणी मोहीम राबवून भेसळयुक्त, निकृष्ट, मुदतबाह्य व अस्वच्छ अन्नपदार्थाविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली. याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाला निवेदन देण्यात आले. दिवाळी मोठ्या प्रमाणावर मिठाई, मावा, खवा, खाद्यतेल, सुकामेवा, फराळाचे पदार्थ आणि इतर खाद्यपदार्थांची खरेदी-विक्री होणारा सण आहे. या काळात अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणे, निकृष्ट दर्जाचे कच्चे साहित्य वापरणे, अनधिकृत खाद्यरंगाचा वापर करणे, मुदतबाह्य पदार्थांची विक्री करणे, तसेच अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक व अस्वच्छ वातावरणात निर्मिती होणे, अशा प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात अन्नसुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा उप महानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम, ललित शर्मा, प्रकाश जोशी, आशुतोष जाधव, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, शाखाध्यक्ष युसूफ खाटीक, संजय मोती, राहुल चव्हाण, दीपक राठोड, खुशाल ठाकूर आदींनी दिला आहे. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम, ललित शर्मा, प्रकाश जोशी, आशुतोष जाधव, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, शाखाध्यक्ष युसुफ खाटीक, संजय मोती, राहुल चव्हाण, दीपक राठोड, खुशाल ठाकूर आदींनी दिला आहे. चौकट मनसेच्या प्रमुख मागण्या विशेष तपासणी मोहीम तातडीने राबवावी, अन्नपदार्थांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करावी, स्वच्छता व साठवणुकीच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, परवाने, नोंदणी, लेबलिंग व मुदतबाह्य पदार्थाची तपासणी करावी, भेसळयुक्त, निकृष्ट व प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठ्यावर कठोर कारवाई करावी, सात दिवसांच्या आत तपासणी मोहिमेचा प्रारंभ करून कार्यवाहीचा आढावा घ्यावा, आदी मागण्या आहेत. -------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com