न्याहाळोद येथील अनाधिकृत विहिरी बंद कराव्यात

न्याहाळोद येथील अनाधिकृत विहिरी बंद कराव्यात
Published on: 
न्याहाळोद येथील अनधिकृत विहिरी बंद कराव्यात नदीपात्रातील विहिरींतून होणारा पाणीउपसा रोखण्याची ग्रामस्थांची मागणी सकाळ वृत्तसेवा न्याहाळोद (ता. धुळे), ता. ३ : यंदा पावसाळ्यात अपेक्षेच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने न्याहाळोद व परिसरात उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. पाण्याचे उपलब्ध स्रोत टिकवून ठेवण्यासाठी आतापासूनच ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. विशेषतः पांझरा नदीपात्रातील अनधिकृत विहिरींमधून मोठ्या प्रमाणावर होणारा पाण्याचा उपसा तातडीने बंद करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. न्याहाळोद परिसरातून वाहणाऱ्या पांझरा नदीपात्रात तसेच नदीकाठच्या शिवारात अनेक विहिरी खोदण्यात आल्या आहेत. परिसरातील विविध गावांमधील शेतकऱ्यांकडून या विहिरींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पाणी उपसून शेतीसाठी वापरले जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळे नदीपात्रातील उपलब्ध जलसाठा आणि भूजल पातळीवर अतिरिक्त ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने जमिनीत अपेक्षित पाणी पुनर्भरण झालेले नाही. अशा परिस्थितीत नदीपात्रातील पाण्याचा मोठ्या प्रमाणावर उपसा सुरू राहिल्यास भविष्यात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने या परिस्थितीकडे दुर्लक्ष न करता तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. या विहिरींची महसूल विभाग, जलसंपदा विभाग आणि भूजल सर्वेक्षण विभागाने संयुक्त पाहणी करावी. संबंधित विहिरींची कायदेशीर स्थिती तपासून नियमबाह्य विहिरींवर कारवाई करावी. तसेच, त्यातून होणारा पाण्याचा उपसा तातडीने थांबविण्यासाठी आवश्यक आदेश द्यावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.