esakal | रेमडेसिव्हिर पुरविणाऱ्या एका समूहाचा वापर थांबविला; रुग्णांवर गंभीर परिणाम?
sakal

बोलून बातमी शोधा

remdesevir

रेमडेसिव्हिर पुरविणाऱ्या एका समूहाचा वापर थांबविला

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : कोरोनासंबंधी (corona virus) हाफकिनतर्फे पुरविण्यात आलेल्या कॅडिला हेल्थकेअरच्या पुरवठ्यातील (supply) शंभर मिलिग्रॅम रेमडेसिव्हिरच्या समूह क्रमांक एल १००१४८ (उत्पादन-मे २०२१, मुदत संपणार-सप्टेंबर २०२२) इंजेक्शनचा रुग्णांवर वापर केल्यावर गंभीर परिणाम दिसून आले आहेत. (Stopped group that provided remedivir)

हेही वाचा: निष्ठावंतांना डावलून पूर्वाश्रमीचे भाजपवासिय समितीत कसे?

रेमडेसिव्हिर पुरविणाऱ्या एका समूहाचा राज्यातील वापर थांबविला

या समूह क्रमांकाच्या साठ्यातील इंजेक्शन उपलब्ध असल्यास त्याचा वापर तातडीने थांबविण्यात यावा, असे आरोग्यच्या सहसंचालकांनी आरोग्य उपसंचालक, सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता, जिल्हा शल्यचिकित्सकांना कळविले आहे. संबंधित जिल्ह्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडे या साठ्यातील इंजेक्शनचे नमुने तपासणीसाठी देण्यात यावेत, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त झाल्यावर या समूह क्रमांकाच्या इंजेक्शन वापराची कार्यवाही करावी, असेही सहसंचालकांनी पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा: नाशिकमध्ये रॅपिड ॲण्टीजेन टेस्ट नंतरच होणार लसीकरण

loading image