नाशिक- जिल्ह्यातील सुरगाणा, कळवण या आदिवासी तालुक्यात २५ वर्षांत स्ट्रॉबेरी पिकाखालील क्षेत्रात उल्लेखनीय वाढ झाली आहे. शेतकऱ्यांनी अभ्यासपूर्वक उत्पादन ते विपणन- विक्रीपर्यंत कसोशीचे प्रयत्न करून स्ट्रॉबेरीचे दर्जेदार उत्पादन घेतले. येथील मातीत व हवामानात पिकणारी लालचुटूक, आकर्षक स्ट्रॉबेरी ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. राज्यासह परराज्यांतील बाजारपेठ त्यास मिळाली आहे. एकरी दोन लाखांपर्यंत नफा देणाऱ्या या पिकाने आदिवासींच्या जीवनात परिवर्तन घडवले आहे.