नाशिक- मोकाट जनावरांनी चिरडल्यामुळे गांधीनगर येथील ज्येष्ठ नागरिक देवीदास जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या महिनाभरात दोन ज्येष्ठ नागरिकांचा अशाच प्रकारे मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मोकाट जनावरांपासून नागरिकांची सुरक्षा हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.