डीजीपीनगर: अशोका मार्ग आणि परिसरात ठिकठिकाणी भटक्या कुत्र्यांनी लहान मुलांवर जीवघेणे हल्ले केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. रविवारी आणि सोमवारी सलग तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये लहान मुलांवर हल्ला झाला असून, हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.