भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यातील जखमींना तातडीने मदत द्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मुख्याधिकाऱ्यांना घेराव

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यातील जखमींना तातडीने मदत द्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मुख्याधिकाऱ्यांना घेराव
Published on: 
पान-२ मेन --- छायाचित्र-07367 सटाणा : मुख्याधिकारी ज्योती भगत-पाटील निवेदन देताना माजी आमदार संजय चव्हाण, भारत काटके, मनोज सोनवणे, सुमनबाई सोनवणे आदी. ....... कुत्र्यांच्या हल्ल्यातील जखमींना मदतीची मागणी सटाण्यात मुख्याधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा घेराव सकाळ वृत्तसेवा सटाणा, ता. २ : शहरात भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात सुमारे १० ते १५ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरलेल्या पालिका प्रशासनाने या जखमी नागरिकांच्या रेबीज प्रतिबंधात्मक उपचारांचा खर्च उचलून त्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी ज्योती भगत-पाटील यांच्या निवासस्थानी शुक्रवारी (ता. २) घेराव आंदोलन केले. या वेळी मुख्याधिकाऱ्यांसह नगराध्यक्षा हर्षदा पाटील यांना निवेदन देण्यात आले. ............. आज शुक्रवारी (ता. २) महात्मा गांधी जयंतीची सुटी असल्याने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट मुख्याधिकाऱ्यांचे निवासस्थान गाठत त्यांना घेराव घातला. या वेळी बोलताना माजी आमदार संजय चव्हाण यांनी शहरातील विविध भागांत मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव धोकादायक ठरत असून, महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांत भीतीचे वातावरण असून, अलीकडे १० ते १५ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. निर्बीजीकरणासाठी दर वर्षी लाखो रुपये खर्च होऊनही कुत्र्यांची संख्या कमी होत नसल्याने मोहिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष सभा घेऊन जखमींना आर्थिक मदत द्यावी व कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली. शहराध्यक्ष भारत काटके व कार्याध्यक्ष मनोज छोटू सोनवणे यांनी जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च पालिकेने उचलण्याची मागणी केली. साहेबराव सोनवणे यांनी निर्बीजीकरणाची मोहीम व्यापक व परिणामकारकपणे राबवून धोकादायक कुत्र्यांवर नियमानुसार तातडीने कार्यवाहीची मागणी केली. शहरात कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे रस्ते, बाजारपेठा, शाळा परिसर आणि वसाहतींमध्ये नागरिकांना सतर्क राहावे लागत असून, रात्री भीतीचे वातावरण असते. प्रशासनाने तक्रारीनंतर कारवाईसह तातडीने प्रतिबंधात्मक उपाय राबवावेत, अशी अपेक्षा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. शहराध्यक्ष भारत काटके, कार्याध्यक्ष मनोज छोटू सोनवणे, माजी उपनगराध्यक्षा सुमनबाई सोनवणे, मयूर अहिरे, संजय पवार, स्वप्नील सोनवणे, विकी महाजन, सोमनाथ शेवाळे, निनाद सोनवणे, किरण शिंदे, भूषण शिंदे, मुन्ना गायकवाड, संजय सोनवणे, सचिन सूर्यवंशी, रऊफ शेख, महेंद्र खैरनार, दादू सोनवणे, जनार्दन सोनवणे, विलास सोनवणे, रोशन जाधव, हर्शल वणीकर, माधव सोनवणे, यशवंत सोनवणे, आसिफ मन्सुरी, रणजित ठाकरे आदी उपस्थित होते. ............................... कोट जखमींपैकी अनेक जण गरीब कुटुंबातील आहेत. उपचारांचा खर्च त्यांना पेलवणारा नाही. त्यामुळे त्यांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी विशेष सभा घेऊन उपचाराचा खर्च तातडीने उपलब्ध करून देणे ही पालिकेची जबाबदारी आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड करू नये. - दीपिका चव्हाण, माजी आमदार, बागलाण .........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com