विद्युतविभागाचा भोंगळ कारभार रस्त्यावर अजुनही पथदिपविनाच

विद्युतविभागाचा भोंगळ कारभार रस्त्यावर अजुनही पथदिपविनाच
Published on: 
मेन --- फोटो - 16045 मालेगाव : विद्युत विभागातर्फे पथदीप बसविण्यासाठी तयार केलेल्या सिमेंट बांधकामामध्ये लावलेले लोखंडी पाइप. --- पथदीपांअभावी वाहनचालकांचा जीव धोक्यात फेमस मार्केट-दरेगाव रस्त्यावर अपघाताचा धोका; पथदीप बसविण्याची मागणी मालेगाव, ता. ५ : शहरातील विविध भागांत एलईडी पथदीप बसविण्यात आले असले, तरी काही पथदीप बंद अवस्थेत आहेत. फेमस मार्केट ते दरेगावदरम्यान विद्युत विभागातर्फे पथदीपांचे नवीन खांब बसविण्यासाठी रस्त्यालगत सिमेंट बांधकामामध्ये लोखंडी पाइप व नट लावण्यात आले आहेत. या रस्त्यावर दुभाजक नसल्याने, तसेच वाहनांची वर्दळ मोठी असल्याने हे पाइप धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी तातडीने पथदीप बसवावेत, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांनी केली आहे. जुना-आग्रा रस्ता, सटाणा नाका, गिरणा पूल, मोतीबाग नाका यांसह विविध भागांत पथदीप बसविण्यात आले आहेत. मात्र, त्यातील काही पथदीप बंद असल्याने रात्रीच्या वेळी अंधाराचा सामना करावा लागत आहे. विद्युत विभागाने या भागात बंद पडलेली पथदीप सुरू करावे, अशी मागणी देखील केली जात आहे. पंधरा दिवसांपासून पाइप तसेच फेमस मार्केट ते दरेगावदरम्यान सुमारे १५ नवीन पथदीपांचे खांब बसविण्याचे नियोजन आहे. त्यासाठी सुमारे पंधरा दिवसांपूर्वी खड्डे खोदून त्याठिकाणी पथदीप लावण्यासाठी सिमेंट बांधकामामध्ये लोखंडी नट व पाइप लावले आहेत. मात्र, अद्याप पथदीपांचे खांब बसविण्यात आलेले नाहीत. या रस्त्यावर दुभाजक नसून रस्ता दर्जेदार असल्याने अनेक वाहनचालक वेगाने वाहने चालवितात. सकाळच्या वेळी शाळकरी मुलांचीही मोठी वर्दळ असते. त्यामुळे अपघात झाल्यास गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. --- कोट पथदीप खांब बसविण्यासाठी जागा सोडून लोखंडी पाइप काढले आहेत. अपघात झाल्यावर मोठे नुकसान होऊ शकते. महापालिकेने तातडीने पथदीप लावावेत. - एक नागरिक, दरेगाव, मालेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com