esakal | नाशिकमध्ये कडक लॉकडाऊन; काय सुरू, काय बंद?
sakal

बोलून बातमी शोधा

नाशिकमध्ये कडक लॉकडाऊन; काय सुरू, काय बंद?

नाशिकमध्ये कडक लॉकडाऊन; काय सुरू, काय बंद?

sakal_logo
By
टीम सकाळ

नाशिक : ब्रेक द चेन (break the chain) मोहीमेत कोरोनाचा प्रादुर्भाव (coronavirus) रोखण्यासाठी प्रशासनाने विविध निर्बंध (lockdown) कडक केले असतांनाही शहर जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत नसल्याचे पुढे आले आहे. (lockdown in nashik district). कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी नाशिकमध्ये येत्या 12 ते 22 मे या 10 दिवसांच्या काळात कडक लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. या काळात नक्की काय सुरू राहिल आणि काय बंद राहिल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार खालीलप्रमाणे माहिती...

हेही वाचा: जिल्ह्यात 23 मे पर्यंत लॉकडाऊन! कडकडीत बंद

नाशिकमध्ये कडक लॉकडाऊन; काय सुरू, काय बंद?

-केवळ वैद्यकीय सेवाच सुरू राहतील

-नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी राहिल

- दूधाचा पुरवठा सकाळच्या सुमारास केवळ घर पोहोच सुरू असेल

-फळे, भाजीपाला या सेवा बंद असतील. पण त्याची घर पोहोच सेवेला मान्यता असेल ते सुद्धा सकाळीच

-किराणा दुकाने बंद असतील. केवळ सकाळच्या काळात होम डिलेव्हरी सुरू असेल

-मॉर्निंग वॉक, जॉगिंग यासाठीही नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही

-कलम १४४ चे कसोशीने पालन केले जाईल

हेही वाचा: पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देऊन तातडीने लस द्या- छगन भुजबळ

-वैद्यकीय चाचण्या किंवा डॉक्टरकडे जाण्यासाठी केवळ परवानगी यासाठी नागरिकांना घराबाहेर पडता येईल

-मेडिकल दुकाने सुरू असतील

-रिक्षा व अन्य परिवहन सेवा पूर्णपणे बंद

-औद्योगिक वसाहतीतील कंपन्या बंद असतील

-ज्या कंपन्यांना उत्पादन सुरू ठेवायचे असेल त्यांना कामगारांच्या निवास, जेवण याची सोय कंपनीतच करावी लागेल. म्हणजेच इन हाऊस उत्पादन सुरू ठेवता येईल

-अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच पेट्रोल पंपावर इंधन मिळेल