वणी- भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम राबविल्यानंतर भारत - पाकिस्तानदरम्यान सध्या निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळांवर सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. आद्यस्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर भाविकांच्या कडक तपासणीनंतरच आदिमायेचे दर्शन होत आहे.