येवला- सर्व व्यवस्थापनाच्या शाळांकडून शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (स्कॉफ) भरण्याचे काम सुरू आहे. ऐन परीक्षांच्या कालावधीत शिक्षकांवर या कामाचा भार पडला असून, १२८ प्रकारची मानके आणि त्यातील प्रत्येकाचे चार स्तर अशी माहिती भरण्यासाठी ३०० ते ५०० फोटो व पुरावे जमवावे लागत आहेत.