श्री दिगंबर जैन मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

श्री दिगंबर जैन मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
Published on: 
ॲंकर NSK26H31353 जळगाव : श्री दिगंबर जैन बहुउद्देशीय मंडळ व दिगंबर जैन महिला मंडळातर्फे आयोजित गुणगौरव सोहळ्यात सत्कारार्थी विद्यार्थ्यांसह मान्यवर. तसेच मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आदी. ----- करिअरच्या स्वप्नांसोबतच मुलांवर संस्कार गरजेचे उपशीर्षक मनोज पाटणी : श्री दिगंबर जैन मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ४ : मुलांना केवळ करिअरची स्वप्ने देण्यापेक्षा त्यांच्यावर चांगला माणूस होण्याचे संस्कार करणे अधिक महत्त्वाचे आहे. शिक्षणामुळे केवळ व्यक्तीची प्रगती न होता, त्याच्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी झाला पाहिजे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते मनोज पाटणी यांनी केले. श्री दिगंबर जैन बहुउद्देशीय मंडळ व दिगंबर जैन महिला मंडळातर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी पर्युषण महापर्वानिमित्त चातुर्मासात निरंकार उपवास करणाऱ्या महिला व पुरुषांचा सत्कार करण्यात आला. प.पू. श्री १०८ तरुण सागर महाराज यांच्या प्रेरणेने तसेच प.पू. श्री १०८ आस्तिक्य सागरजी व विनियोग सागरजी महाराज यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी जैन समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय शैक्षणिक यश संपादन करणाऱ्या ३२ गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा, तसेच चातुर्मासात निरंकार उपवास करणाऱ्या १५ महिला व पुरुषांचा सत्कार नेमीचंद जैन, धन्यकुमार जैन, मनोज पाटणी, विश्वनाथ चतुर, निर्मल चांदीवाल, मंगेश कुटे, ॲड. चंद्रशेखर चतुर, राजेंद्र याळकर, नितीन जैन, ज्योती सूर्यवंशी, ॲड. रेवती चतुर, अंजू काला यांच्या हस्ते करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. धन्यकुमार जैन यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाबाबत भूमिका मांडली. कार्यक्रमास समाजबांधव, पालक, विद्यार्थी व महिला मंडळाच्या सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दीपक फुलमोगरे यांनी सूत्रसंचालन केले. महाप्रसादाने कार्यक्रमांची सांगता झाली. ---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com