अनुभूती बाल निकेतनमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा अविष्कार

अनुभूती बाल निकेतनमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा अविष्कार
Published on: 
NSK26H34468 जळगाव : कला प्रदर्शनाचे उद्घाटन करताना अतुल जैन, डॉ. भावना जैन, मनोज परमार आणि स्कूलच्या शिक्षिका. -------- अनुभूती बालनिकेतनमध्ये कलागुणांचा अविष्कार उपशीर्षक वारली चित्रकला, नैसर्गिक साहित्यासह भूरूपांच्या प्रतिकृती ठरल्या आकर्षण सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ४ : विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला, सर्जनशीलतेला आणि कलागुणांना व्यासपीठ मिळावे, यासाठी अनुभूती बाल निकेतन व अनुभूती विद्या निकेतन येथे भव्य कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेल्या आकर्षक कलाकृती, नैसर्गिक साहित्याचा कल्पक वापर, पारंपरिक वारली चित्रकला, चंद्राचा विस्तृत नकाशा आणि विविध भूरूपांच्या प्रतिकृतींनी या प्रदर्शनात विशेष लक्ष वेधून घेतले. या प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यालयाचे चेअरमन अतुल जैन, डॉ. भावना जैन यांच्या हस्ते करण्यात आले. संचालिका निशा जैन आणि अंबिका जैन यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या सामूहिक प्रयत्नांचे कौतुक करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. अशोक जैन यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृती आणि विविध शैक्षणिक नमुन्यांची पाहणी करून कलाकृतींबद्दल कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यालय करीत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा करत त्यांनी शिक्षक आणि पालकांचेही अभिनंदन केले. प्रदर्शनास ज्योती जैन, शोभना जैन, फरहाद गिमी, अथांग जैन, अन्मय जैन, नंदलाल गादीया आदींनी भेट देऊन कौतुक केले. ---- (चौकट) चंद्राचा नकाशा ठरले आकर्षण प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरला तो इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेला चंद्राचा विस्तृत नकाशा. या नकाशात चंद्रावरील पर्वत, दऱ्या, विविध भौगोलिक रचना तसेच चांद्रयान आणि अपोलो-११ यांच्या चंद्रावरील उतराईची ठिकाणे दर्शविण्यात आली होती. --------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.