
नाशिक : गंगापूर रोडवरील मविप्र संस्थेच्या केटीएचएम महाविदयालयाच्या मुलांच्या वस्तीगृहात २१ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्त्या केल्याची खळबळजनक घटना घडली. गौरव रमेश बोरसे (२१, मूळ रा. डांगसौंदाणे, ता. सटाणा) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. गौरव वाणिज्य शाखेच्या तिसऱ्या वर्षाच्या वर्गात शिक्षण घेत होता. (Student hanged himself in hostel of KTHM college Nashik Latest Marathi News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव बोरसे हा केटीएचएम महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतीगृहात राहत होता. मंगळवारी (ता. २२) सकाळी गौरव राहत असलेल्या शेजारील खोलीतील मुलगा त्यांच्याकडे इस्त्री घेण्यासाठी गेला. त्यावेळी त्याने गौरवच्या खोलीचा दरवाजा वाजविला. मात्र तो दरवाजा उघडत नसल्याने सदरील माहिती वरिष्ठांना देण्यात आली. त्यानंतर दरवाजा उघडून पाहिले असता गौरव याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
याप्रकरणी तातकाळ सरकारवाडा पोलिसांना घटनेची माहिती कळविण्यात आली. गौरवचा मृतदेह जिल्हा रुग्णालयता शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयाच्या आवारात नातलगांसह त्याच्या मित्रांनी गर्दी केली होती. सदरील घटनेमुळे हळहळ व्यक्त होत होती.
आई-वडिलांना ‘सॉरी’चा मेसेज
गौरव हा वाणिज्य शाखेच्या तिसऱ्या वर्गात शिकत होता. तसेच तो सीए असलेल्या मामांकडे पार्टटाईम काम करीत होता. वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. २१) मध्यरात्रीपर्यंत गौरव त्याच्या मित्रांसमवेत गप्पा करीत होता.
आर्थिक विवंचनेतून गौरव याने टोकाचे पाऊल उचलले गेल्याचे बोलले जाते. तसेच, गौरव याने रात्रीच आई-वडिलांच्या मोबाईलवर ‘सॉरी’ असा मेसेज टाकल्याचे समजते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.