शिरपूर : आविष्कार स्पर्धा बातमी

शिरपूर : आविष्कार स्पर्धा बातमी
Published on: 
(पान ४ ला ॲंकर) SHC26B13455 शिरपूर : अविष्कार जिल्हास्तरीय संशोधन स्पर्धेचे उद्‌घाटन करताना डॉ. तुषार रंधे व पदाधिकारी. ---------- संशोधनातूनच राष्ट्राची प्रगती डॉ. तुषार रंधे : एसपीडीएममध्ये अविष्कार स्पर्धेत विद्यार्थ्यांचा सहभाग सकाळ वृत्तसेवा शिरपूर, ता. ७ : संशोधनासाठी मोठ्या सोयी- सुविधांची गरज नसते. विद्यार्थ्यांच्या संशोधनातूनच राष्ट्राची प्रगती साध्य होणार आहे. त्यामुळे विद्यापीठाने आविष्कार स्पर्धेतील राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांनी व्यक्त केली. येथील ‘एसपीडीएम’ महाविद्यालयात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत धुळे जिल्हास्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेची प्रथम फेरी नुकतीच पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. संस्थेचे सचिव निशांत रंधे, कोशाध्यक्षा आशाताई रंधे, विश्वस्त रोहित रंधे, डॉ. एस. एन. पटेल, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य तथा प्राचार्य संजय सुराणा, अधिसभा सदस्य डॉ. गजानन पाटील, डॉ. संदीप नेरकर, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील, आर. सी. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हितेंद्र महाजन, रंधे कन्या विद्यालयाच्या प्राचार्या सारिका रंधे, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य महेश पवार, बोराडी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. एम. पावरा उपस्थित होते. या स्पर्धेत एक हजार ८१ पोस्टर्स, ७५ मॉडेल्ससह एकूण एक हजार ९५६ स्पर्धकांनी विक्रमी सहभाग नोंदविला. डॉ. प्रवीण महाले म्हणाले, संशोधनासाठी मोठ्या प्रयोगशाळांची गरज नसते. कोणतेही काम केवळ काम म्हणून न करता आनंदाने केले पाहिजे. अपयशातून नवी शिकवण मिळते. ‘जेन झी’च्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह असून, त्यांच्या ऊर्जेचा योग्य वापर होणे गरजेचे आहे. प्रा. दीपक दलाल म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या संशोधनाला कधीही लहान समजू नये. याच संशोधनातून पुढे पेटंट, कॉपीराइट आणि स्टार्टअपच्या संधी निर्माण होऊ शकतात. प्राचार्य एस. एस. राजपूत यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. अविष्कारचे समन्वयक डॉ. लखन चौधरी यांनी स्पर्धेचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्व सांगितले. डॉ. स्वाती विहिरे व डॉ. एन. एस. डोंगरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. व्ही. एल. चव्हाण यांनी आभार मानले. सहसमन्वयक डॉ. प्रेमकिरण भदाणे, उपप्राचार्य डॉ. ए. एम. देशमुख, डॉ. दिनेश भक्कड, प्रा. विलास चव्हाण, कार्यालय अधीक्षक डॉ. चारुशीला ठाकूर यांनी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com