विद्यार्थ्यांच्या कल्पनांना उद्योजकतेचे पंख

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना उद्योजकतेचे पंख
Published on: 
फोटो : NSK26H33076 नंदुरबार : स्टार्टअप मेळाव्याची पाहणी करताना सुषमा शाह, पार्थ देसाई, प्रशांत बागुल, भिकू त्रिवेदी, सुनील शाह आदी. ------------- विद्यार्थ्यांच्या कल्पनांना उद्योजकतेचे पंख श्रॉफ हायस्कूलमध्ये आयोजित स्टार्टअप मेळाव्यात ३५ गटांचा सहभाग सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. २१ : विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय विचारसरणी, नवकल्पना आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करण्यासाठी येथील श्रीमती हि. गो. श्रॉफ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘विद्यार्थी स्टार्टअप मेळावा’ झाला. शाळेच्या अटल टिंकरिंग लॅबचे प्रमुख राजेंद्र मराठे यांच्या संकल्पनेतून आयोजित मेळाव्यात एकूण १५० विद्यार्थ्यांनी विविध नाविन्यपूर्ण उत्पादने सादर केली. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या स्टार्टअप कंपन्या स्थापन करून कंपनीचे नाव, लोगो, उत्पादनाची संकल्पना तसेच व्यवसायाचे सादरीकरण केले. मेळाव्यात एकूण ३५ विद्यार्थी स्टार्टअप गटांनी सहभाग नोंदविला. ----------- विद्यार्थ्यांनी आरोग्य, हस्तकला, तंत्रज्ञान, पर्यावरण तसेच दैनंदिन जीवनातील समस्यांवर आधारित विविध नाविन्यपूर्ण उत्पादने प्रदर्शनासाठी ठेवली. राजेंद्र मराठे यांनी शाळेत उद्योजकता व नवोपक्रमाला चालना देणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे व्यवसाय शिक्षण विभागप्रमुख विनोद लवांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी समस्यांकडे संधी म्हणून पाहावे, असे त्यांनी आवाहन केले. माजी विद्यार्थी तसेच चार्टर्ड अकाउंटंट पार्थ देसाई यांनी विद्यार्थ्यांना विविध उद्योजकीय संकल्पना समजावून सांगितल्या. अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या समन्वयक सुषमा शाह यांनी शाळेमार्फत उद्योजकता, नवोपक्रम आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनांना प्रत्यक्ष कृतीची जोड द्यावी, असे त्यांनी सांगितले. या वेळी ई- सेल, आयआयटी मुंबईकडून मेंटरशिप मिळाल्याबद्दल राजेंद्र मराठे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास मुख्याध्यापक प्रशांत बागूल, उपमुख्याध्यापक भिकू त्रिवेदी आणि पर्यवेक्षक सुनील शाह यांची उपस्थिती होती. फलकलेखन शिवाजी माळी यांनी केले. राहुल वडनेरे यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षिका सीमा पाटील यांनी आभार मानले. जगदीश वंजारी व सुनील गिरासे यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com