Nashik: परदेशी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची झटापट! पुणे विद्यापीठाच्‍या विलंबामुळे तिकीट रद्द करण्याची वेळ

SPPU
SPPUesakal

Nashik News : करिअरच्‍या दृष्टीने सजग झालेले सध्याचे विद्यार्थी शिक्षणासाठी थेट परदेश गाठतात. असेच नियोजन करून तिकीट व अन्‍य प्रक्रिया पूर्ण करूनही काही विद्यार्थ्यांना ध्येय गाठण्यासाठी झटापट करावी लागल्‍याचे समोर येत आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे निकालात झालेल्‍या विलंबामुळे विद्यार्थ्यांना दमछाक करावी लागली आहे. अशा विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता विद्यापीठाने सहकार्य करणे अपेक्षित असल्‍याचे पालकांनी म्हटले आहे. (Students rush for foreign education Time to cancel ticket due to Pune University delay Nashik)

परदेशात शिक्षण घेऊ इच्‍छिणाऱ्या नाशिकच्‍या काही विद्यार्थ्यांना केवळ प्रलंबित निकालामुळे संपूर्ण नियोजन बदलावे लागल्‍याचे ‘सकाळ’ला दिलेल्‍या माहितीत सांगितले आहे. यापैकी काही विद्यार्थ्यांनी थेट पुणे गाठत विद्यापीठातून गुणपत्रिका व अन्‍य आवश्‍यक कागदपत्र मिळविण्यासाठी प्रयत्‍न केले.

काहींना त्‍यातही अपयश आल्‍याने ऐनवेळी तिकीट रद्द करावे लागल्‍याचे सांगितले जात आहे. अशा विद्यार्थ्यांची संख्या कमी असली, तरी विद्यापीठाच्‍या समन्‍वयाच्‍या अभावाचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

SPPU
Nashik BJP News: मध्य प्रदेशात प्रचारासाठी भाजपकडून फरांदेंसह नाशिकच्या चौघांना पाचारण

"परदेशात पदव्‍युत्तर पदवी शिक्षणाकरिता जाण्याचे संपूर्ण नियोजन आखलेले असताना, केवळ विद्यापीठाकडून निकाल जाहीर करण्यास झालेल्‍या विलंबामुळे मनःस्‍ताप सहन करावा लागला. विद्यापीठ प्रतिनिधींमार्फत थेट विद्यापीठ गाठून प्रमाणपत्रे मिळविण्याचा प्रयत्‍न केला. परंतु तेथेही चुकीच्‍या पद्धतीने वागणूक दिली गेली. काही कर्मचाऱ्यांच्या चुकीच्‍या वागण्याने संपूर्ण विद्यापीठाचे नाव बदनाम होते." - मनःस्‍ताप झालेला विद्यार्थी.

"कोरोनानंतर विस्कळित झालेले वेळापत्रक पूर्ववत करून वेळेत परीक्षा घेणे, निकाल लावण्यासाठी विद्यापीठ प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहे. काही विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी किंवा विदेशात शिक्षण घेण्यासाठी कागदपत्रे मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर करून एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये, हा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. समस्येचा सामना करणाऱ्यांनी संपर्क करावा."

- सागर वैद्य, व्‍यवस्‍थापन परिषद सदस्‍य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.

SPPU
Nashik News: बहुतांश अधिकाऱ्यांना देता आली नाही उत्तरे! ZPतर्फे 15 दिवसांनी पुन्हा होणार परीक्षा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com