नामपूर- सध्याच्या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी शाळा पातळीवर होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी, यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा शासनाचा मुख्य उद्देश आहे.