NMC School Uniform: मनपा विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा विषय मार्गी

NMC School Uniform
NMC School Uniformesakal

NMC School Uniform : महापालिकेच्या २७ हजार विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा विषय मार्गी लागला आहे, दोन दिवसांपूर्वी लेखा विभागात आलेली फाइल चोवीस तासात मार्गी लागली. नवीन शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांनी लेखा विभागाकडून निधीची मंजुरी घेत फाइल प्रभारी आयुक्तांकडे नेली.

त्यामुळे शुक्रवार (ता. २९) पर्यंत गणवेशाचा निधी शाळा व्यवस्थापन समितीला वर्ग होऊन जुलैच्या पहिल्या आठवड्यात २७ हजार विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. (subject of NMC School students Uniform become easy nashik)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMC School Uniform
NMC School Uniform: विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाची प्रतीक्षा! लेखा विभागाच्या निर्णयामुळे ओढवली वेळ

तत्कालीन शिक्षणाधिकारी धनगर यांनी लाचखोरीत सापडल्याने यंदा विद्यार्थ्यांवर शाळेच्य‍ा पहिल्या दिवशी जुना गणवेश घालण्याची वेळ आली. पंधरवडा लोटला तरी अद्याप २७ हजार विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहे.

नवीन शिक्षणाधिकारी पाटील यांनी पदभार स्वीकारला त्यानंतर हा विषय पुढे सरकला. गणवेश प्रश्नावर लक्ष घालत फाइल मंजुरीसाठी मंगळवारी (ता. २७) लेखा विभागाकडे सरकली.

शिक्षण विभागाचे अंतिम निर्णय हे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या मंजुरीनंतर सायंकाळपर्यंत २७ हजार विद्यार्थ्यांच्या गणवेषासाठी निधी शाळा व्यवस्थापन समितीला वर्ग केला जाईल.

NMC School Uniform
NMC Hoarding Audit : शहरात धोकादायक होर्डिंगची शोधमोहीम; 3 संस्थांवर जबाबदारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com