सृजनशीलता उंचावत मिळवा यश | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रझा काबूल : ‘अनंत तरंग’ प्रदर्शनाचे दिमाखात उद्‌घाटन

नाशिक : सृजनशीलता उंचावत मिळवा यश

नाशिक : जागतिक स्‍तरावरील प्रेरणा ठेवताना आर्किटेक्‍टने काम केले पाहिजे. सर्वच प्रकल्‍प प्रत्‍यक्षात आणण्यासाठीचा प्रयत्‍न करत राहावा. सर्वच संकल्‍पना प्रत्‍यक्षात उतरतीलच असे नाही. परंतु, आपल्‍यातील सृजनशीलता उंचावताना यशस्‍वी कामगिरी करावी असा सल्‍ला प्रसिद्ध वास्तुविशारद, इंटिरियर डिझायनर, लॅण्ड्स्केप आणि शहरी नियोजक रझा काबूल यांनी गुरुवारी (ता.१८) दिला.

गोवर्धन येथील एमईटी स्‍कूल ऑफ आर्किटेक्‍चर आणि इंटिरियर डिझाईन यांच्‍या ‘अनंत तरंग’ या वार्षिक शैक्षणिक प्रदर्शनाच्‍या उद्‌घाटनाप्रसंगी ते बोलत होते. त्‍यांच्‍या हस्‍ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. या वेळी त्‍यांनी विद्यार्थ्यांशी लाइफ ऑफ एन आर्किटेक्‍ट’ या विषयावर संवाद साधला. या वेळी त्‍यांनी वास्तुविशारद होण्याकरिता आवश्यक असणाऱ्या गुणांविषयी व सवयीबद्दल अवगत केले.

वास्तुविशारदाचा जीवनपट कसा असावा, हे उलगडून दाखवले. या वेळी रझा काबूल म्‍हणाले, की तांत्रिक बदलांबाबत विचार करताना विद्यार्थ्यांनी काळानुरूप बदलत राहिले पाहिजे. प्रदर्शनातील इंस्टॉलेशन्स त्यांनी बारकाईने पाहणी करताना कौतुक केले. हे प्रदर्शन तीन दिवस चालणार असून, पहिल्या दिवशी वार्षिक शैक्षणिक प्रदर्शन २०२१ चे औचित्य साधत विद्यार्थ्यांच्या परिपूर्ण विकासासाठी शिक्षणाबरोबर, कला व खेळ यांचे नाते टिकवण्यासाठी क्रिकेट, ट्रेझर हंट, सलाड मेकिंग या स्पर्धा घेण्यात आल्या.

आर्किटेक्‍ट नितीन पटेल यांनी ‘फोल्ड टू अनफोल्ड’ ही कार्यशाळा घेत ओरिगामीची प्रात्याक्षिके दाखवली. शुक्रवारी (ता.१९) अशाच विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याप्रसंगी मेट स्कूल ऑफ आर्किटेक्चर आणि इंटिरियर डिझाईनचे संचालक आर्किटेक्ट भालचंद्र चावरे, प्राचार्य आर्किटेक्ट कृष्णा राठी, निष्ठा कारखानीस, एमईटी भुजबळ नॉलेज सिटीच्या मार्गदर्शिका डॉ. शेफाली भुजबळ, प्रसिद्ध आर्किटेक्ट संजय पाटील यांच्‍यासह मान्‍यवर उपस्‍थित होते.

loading image
go to top