फोटो : NSK26H32966
नंदुरबार : गुणवंत गौरव सोहळ्यास उपस्थित संदीप पाटील, प्रांजल पाटील, युवराज पाटील, बी. एस. पाटील, निंबाजीराव बागूल, विश्वास पाटील, मधुकर पाटील आदी.
------------------
स्पर्धा परीक्षेचा मार्ग खडतर असला तरी यशाकडे नेणारा
संदीप पाटील : मराठा पाटील समाज मंडळातर्फे गुणवंतांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. २० : स्पर्धा परीक्षेचा मार्ग खडतर असला तरी जिद्द आणि चिकाटी ठेवली तर यश हमखास मिळते, असे प्रतिपादन नंदुरबार शहराचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी केले.
स्व. जी. टी. पाटील उर्फ बापूजी यांच्या स्मृतीदिनानिमित्त मराठा पाटील समाज मंडळातर्फे समाजातील गुणवंत विद्यार्थी व समाज बांधवांचा गुणगौरव सोहळा हरीभाऊ मराठा पाटील समाज मंगल कार्यालयात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यस्थानी मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य बी. एस. पाटील होते. व्यासपीठावर नायब तहसीलदार प्रांजल पाटील, नंदुरबार जिल्हा संस्था चालक संघटनेचे सचिव व चिंतामण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष युवराज पाटील उपस्थित होते.
प्रांजल पाटील म्हणाले, जीवनात मिळालेल्या यशाने हुरळून जाऊ नये आणि अपयशाने निराश होऊ नये. मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य बी. एस. पाटील म्हणाले, समाजातील तरूणांनी सामाजिक जाणीवा जोपासण्यासाठी प्रयत्नशील असावे. समजातील कालबाह्य रूढी- परंपरांना मूठमाती देऊन सामाजिक परिवर्तनाची कास धरावी. समाज संघटित होणे काळाची गरज आहे. मंडळाचे सचिव निंबाजीराव बागूल यांनी प्रास्ताविक केले. वसंत पाटील व एन. टी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सहसचिव मधुकर पाटील यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी उपाध्यक्ष विश्वास पाटील, श्रीराम बोरसे, सहसचिव रमेश मोरे, मधुकर पाटील, डी. व्ही. सोनवणे, किरण पाटील, वसंत पाटील, एन. टी. पाटील, राजेंद्र बागूल यांच्यासह कार्यकारिणी व गुणगौरव समिती सदस्यांनी परिश्रम घेतले.