Success Story: रोबोटीक्स वर्ल्ड चॅम्पियनमध्ये चमकले चिमुकले!

Igatpuri group education officer Nilesh Patil, Sagar Patil, Damini Jadhav, Omkar Pingle, Shobari Sarkar while welcoming the runners-up in the robotics world champion competition on their arrival at the railway station here.
Igatpuri group education officer Nilesh Patil, Sagar Patil, Damini Jadhav, Omkar Pingle, Shobari Sarkar while welcoming the runners-up in the robotics world champion competition on their arrival at the railway station here.esakal

Success Story : रोबोटिक्स वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेमध्ये नाशिकच्या होरायझन इंग्लिश अँकेडमीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दुसरे स्थान प्राप्त करत नाशिक जिल्हयाचे आणि देशाचे नाव उंचावले आहे.

नवी दिल्ली येथील जागतिक स्टेडिअमवर झालेल्या स्पर्धेत जगभरातील विविध ३४ देशातील ३०० पेक्षा अधिक संघ आणि स्पर्धक सहभागी झालेले होते. या स्पर्धेत नाशिकच्या चिमुकल्यांनी जागतिक स्तरावर दुसरा क्रमांक प्राप्त करून नाशिकचे नाव उज्ज्वल केले आहे. (Success Story horizon school students Shine in Robotics World Champion Nashik)

या विजेत्यांत अवनी निकम, वैष्णवी पवार, किर्ती मेटकर, शनय सोनवणे, प्रत्युष पाटील, आरूष कहारे, आरोह कापसे, देवांग बेदमुथा या मुलांनी सहभाग घेऊन विश्वचषक स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस प्राप्त केले आहे.

सर्व विद्यार्थ्यांना रिबोटचे मार्गदर्शक सागर पाटील, दामिनी जाधव, ओंकार पिंगळे, शोबरी सरकार यांचे मार्गदर्शन लाभले.

या विद्यार्थ्यांचे इगतपुरी व नाशिकरोड रेल्वे स्थानकात आगमन होताच जंगी स्वागत करण्यात आले. टीममधील प्रत्युष पाटील हा इगतपुरीचे गटशिक्षणाधिकारी नीलेश पाटील यांचा मुलगा आहे. विजेत्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

फक्त दहा दिवसांच्या सरावातून या चिमुकल्यांनी हे यश प्राप्त केले असून हा त्यांचा पहिलाच प्रयत्न होता. आगामी स्पर्धेत विश्वचषक जिंकणारच असा मानस आणि विश्वास सर्व चिमुकल्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Igatpuri group education officer Nilesh Patil, Sagar Patil, Damini Jadhav, Omkar Pingle, Shobari Sarkar while welcoming the runners-up in the robotics world champion competition on their arrival at the railway station here.
NMC Anganwadi : महापालिकेच्या अंगणवाड्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट

सर्व विजेत्यांचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आसिमा मित्तल, तहसीलदार अभिजित बारावकर, शिक्षणाधिकारी भगवान फुलारी, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड आदींनी अभिनंदन केले आहे.

"रोबोटिक्स जागतिक स्पर्धेसाठी आम्हाला खूप कमी दिवसांचा कालावधी मिळाला. कमी सराव असला तरी आम्ही जिद्द कायम ठेवत उपविजेतेपद प्राप्त केले. हा आमचा पहिलाच प्रयत्न होता, पण आगामी स्पर्धेसाठी आम्ही सर्वजण कसून सराव करून पुढील विश्वचषक आम्ही जिंकणारच असा निर्धार प्र्तेयकाने केला आहे."- प्रत्युष पाटील, रोबोटिक्स खेळाडून, नाशिक.

Igatpuri group education officer Nilesh Patil, Sagar Patil, Damini Jadhav, Omkar Pingle, Shobari Sarkar while welcoming the runners-up in the robotics world champion competition on their arrival at the railway station here.
Sambhaji Bhide Controversy: संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करत अटकेची NCP, समता परिषदेची मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com