Success Story | जिद्द : प्लंबिंग व्यवसायातून उभ्या राहिल्या मनीषाताई

Manisha tai vanise ahire
Manisha tai vanise ahireesakal

शेतकरी कुटुंबातील सदस्य होतानाच अवघं वय दहा वर्षांचं असतानाच वडिलांचं निधन झालं. कुटुंबाची जबाबदारी आईवर आलेली असताना आईला मदत करत शेती व्यवसायात आधार बनत होती. मात्र आयुष्यातील नियतीनं वैवाहिक जीवनात दुःख देत कपाळावरचं कुंकू हिरावून नेलं... मात्र पतीने दिलेल्या आत्मविश्वासाच्या शिदोरीवर भक्कम पाऊल टाकत कुटुंबाचा प्लंबिंग व्यवसाय पुढे नेत पुरुषप्रधान संस्कृतीला छेद दिला आहे तो मनीषाताई वनीस-अहिरे यांनी..! (Success Story Manisha Tai rose from plumbing business Nashik jidd News)

मनीषाताई यांचे माहेर मालेगाव तालुक्यातील सोनज, तर सासर बागलाण तालुक्यातील करंजाड येथील... वडील विक्रम देवराम अहिरे यांचे पत्नी अलकाबाई यांच्यासह मुली मनीषा, कविता, सारिका आणि मुलगा स्वप्नील असे सहा जणांचे कुटुंब... दुष्काळी परिस्थितीत उत्पन्न तुटपुंजे असल्याने मजुरीसाठीही कुटुंबाला जावे लागत होते. त्यातच मनीषाताई घरातील ज्येष्ठ कन्या. आई- वडिलांच्या खांद्याला खांदा लावून त्याही शेतीत राबत राहिल्या. त्यामुळे दहावीनंतर त्यांचेही शिक्षण सुटले. २००५ मध्ये मनीषाताई यांचा विवाह बागलाण तालुक्यातील करंजाड येथील नानाजी वनीस यांच्याशी झाला.

नानाजी यांचेही शिक्षण दहावी पास... विवाहानंतर महिनाभरातच कुटुंबाने नाशिकचा रस्ता धरला. नाशिकमध्ये नानाजी भाड्याने रिक्षा चालवत होते. जगात स्वाभिमानाने जगायचे असेल तर स्वतः खंबीर हो... या वाक्याने त्या नेहमीच मनीषाताईंना पाठबळ देत होते. मनीषाताई यांनी शिवणकामाचे प्रशिक्षण घेत घरी बसून शिवणकाम करत कुटुंबासाठी आधार बनल्या. नानाजी यांनी रिक्षा चालवत असतानाच प्लंबिंगचे काम सुरू केले. पतीला मदत व्हावी, यासाठी त्याही प्लंबिंग कामात मदत करू लागल्या अन्‌ प्लंबिंग काम शिकल्या.

चिमुकल्यांच्या भविष्यासाठी उभ्या राहिल्या मनीषाताई

मानव आणि मान्यता या मुलांनिमित्ताने कुटुंब वाढले. मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देत त्यांनी व्यवसायही सांभाळला. याच काळात कुटुंबाला महापालिकेकडून अधिकृत प्लंबर व व्हॉल्व्हमन म्हणून महापालिकेत नोकरी मिळाली. प्लंबिंगचा परवाना मिळाल्याने व परिसरातील नव्या वसाहतींमध्ये कामे वाढत असल्याने मनीषाताई यांनी शिवणकाम बंद करत पूर्णपणे प्लंबिंगच्या व्यवसायात झोकून दिले. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या व्यवसायात स्वतःची ओळख उभी करीत भक्कम पाऊल रोवले.

Manisha tai vanise ahire
Nashik : शहरभर CCTV बसविण्याच्या कामास वेग; संपूर्ण शहर तिसऱ्या डोळ्याच्या कक्षेत

नियतीपुढे हतबल...

सर्वकाही व्यवस्थित सुरू असतानाच आयुष्यातील २००५ पासून सुरू असलेला प्रतिकूल परिस्थितीतून पुढे जाणारा प्रवास भक्कम होईल, असे वाटत असतानाच कोरोनासारख्या महामारी मनीषाताई यांच्याही कुटुंबाला उद्ध्वस्त करून गेली. कोरोनाच्या सुरवातीला नानाजी यांना कोरोनामध्ये आपला जीव गमवावा लागल्याने मनीषाताई यांच्यासह मानव आणि मान्यता यांचा आधारच नियतीने हिरावून नेला.

माणुसकी धावली...

दहा वर्षांच्या असताना वडिलांचं छत्र हरपलं आणि ऐन आयुष्याच्या जगण्याच्या उंबरठ्यावर पतीची साथ सुटली... मात्र कुटुंबावर आलेल्या आघातातून सावरत मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देतानाच त्यांनी प्लंबिंग व्यवसायाला पुढे नेलं. नेहमीच परिसरात सकारात्मक आयुष्य जगणाऱ्या कुटुंबाची जाणीव ठेवून महापालिकेतील सेवानिवृत्त अधिकारी संजीव बच्छाव यांची मोलाची मदत झाली. त्यामुळे त्यांना अधिकृत प्लंबर म्हणून व्यवसायाला पुढे नेता आले.

याशिवाय महापालिकेच्या सुजाता भारंबे, गोपाल आव्हाड, संतोष उगले, संदीप जगझाप यांच्यासह माहेरच्या सदस्यांसह वनीस कुटुंबातील रमेश वनीस, विनोद वनीस यांनी दिलेला आधार मोलाचा असल्याचे त्या सांगतात. अकरावी इयत्तेत शिकणाऱ्या मुलगा मानवने या व्यवसायाला पुढे नेतानाच वडिलांचा वारसा पुढे न्यावा, अशी अपेक्षाही त्या व्यक्त करतात. मुलगी मान्यता सध्या सातव्या इयत्तेत शिक्षण घेतेय.

नवा व्यवसाय महिलांसाठी खुणावतोय...

प्लंबिंग व्यवसाय हा दिवसेंदिवस वाढतच जाणार असल्याने महिलांनी नक्कीच या व्यवसायात यावे. यात आर्थिकदृष्ट्या भक्कम होतानाच मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध असल्याचे त्या सांगतात. कुटुंबातील पुरुष कामावर गेल्यानंतर किचनपासून ते थेट पाइपलाइन टाकण्यासाठी घरातील महिला सदस्य प्लंबिंग क्षेत्रात असलेल्या महिलांना प्राधान्य देण्यासाठी नेहमीच तत्पर असल्याने नक्कीच या व्यवसायात कमी भांडवलात पुढे जाण्यासाठी आवाहन करतानाच महिलांना प्लंबिंग व्यवसायाचे मोफत शिक्षण देण्यासाठी मी तयार असल्याचे मनीषाताई यांनी सांगितले.

Manisha tai vanise ahire
Nashik Crime News : तरुणीच्या दुचाकीत सापडला गावठी कट्टा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com