
Rudraksh Mahotsav : रुद्राक्ष महोत्सवासाठी मालेगावकरांची जय्यत तयारी; वाहने झाली हाऊसफुल्ल
मालेगाव (जि., नाशिक) : पंडीत श्री प्रदीप मिश्रा यांच्या सिहोर (मध्यप्रदेश) येथे होणाऱ्या रुद्राक्ष महोत्सवासाठी मालेगावसह खानदेशमधून खासगी वाहने हाऊसफुल झाली आहेत. मालेगावहून शेकडो वाहनातून सातशेहून अधिक सेवेकरी सिहोरला जाणार आहेत.
अजूनही मालेगावातून भाविक सिहोरला रवाना होणार आहे. यासाठी खासगी वाहनांचा शोध घेतला जात आहे. रुद्राक्ष महोत्सवासाठी वाहने आरक्षित झाल्याने लग्नसोहळ्यातील वधू-वर पित्यांचीही वाहनांसाठी धावपळ होत आहे.
दरम्यान रविवारी (ता.१२) येथील बाळासाहेब ठाकरे क्रिडा संकुलात पुण्यश्री महाशिवपुराण कथा समितीतर्फे किट व पासचे वाटप करण्यात आले. (Successful preparation of Malegaon for Rudraksh Mahotsav Vehicles become housefull nashik news)
सिहोर येथे १६ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत रुद्राक्ष महोत्सव होणार आहे. महोत्सवात शिवभक्तांना २४ तास रुद्राक्षाचे वाटप केले जाणार आहे. मालेगाव येथील शेकडो शिवभक्त भाविकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहेत.
सेवेकऱ्यांची वाहने येथील कॉलेज मैदानावरून १५ फेब्रुवारीला सकाळी सातला सिहोरकडे रवाना होतील. येथील पुण्यश्री महाशिवपुराण कथा समितीतर्फे पालकमंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली सिहोर येथे करण्यात येणाऱ्या सेवेचे नियोजन केले जात आहे.
समिती दोन महिन्यापासून या कामात व्यस्त आहे. देविदास पाटील, रामदास भामरे, संजय खैरनार, जयेश पांडे, प्रदीप पाटील, महेंद्र पाटील, भूषण पाटील, आनंद खैरनार, विजय कर्पेकर, योगेश पवार, गोपी सावळे, प्रवीण परदेशी, अभिषेक तिवारी, गजेंद्र खुराशिया, दादाजी सूर्यवंशी आदींसह समितीचे पदाधिकारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. समितीच्या सटाणा नाक्यावरील कार्यालयात स्वयंसेवक नियोजन करीत आहेत.
हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस
रुद्राक्ष महोत्सवामुळे खासगी वाहने पूर्णपणे आरक्षित झाली आहेत. तीन, पाच व सात दिवसांसाठी शिवभक्त सिहोरला जात आहेत. हजारो शिवभक्तांना वाहने मिळत नाहीत. काहींनी रेल्वेचे आरक्षण केले आहे. बहुतांशी रेल्वेत आरक्षण झाले आहेत. सध्या लग्नसराईची धूम आहे. रुद्राक्ष महोत्सवाला जाण्यासाठी शहरासह गावागावातून शिवभक्तांची लगबग सुरु झाली आहे.
"मालेगावातील पुण्य श्री महाशिवपुराण कथा समितीतर्फे व पालकमंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनानुसार सेवेकरी रुद्राक्ष महोत्सवासाठी सिहोरला जाणार आहेत. सेवेकऱ्यांची वाहने १५ फेब्रुवारीला रवाना होतील. या निमित्ताने सेवेकऱ्यांना किट व पासचे वाटप करण्यात आले आहे. मालेगावातील सेवेकऱ्यांसाठी एकसारखा ड्रेस कोड असणार आहे."
- देविदास पाटील, प्रमुख श्री शिवाय नमस्तुभ्यं ग्रुप, मालेगा