धुळे ः टुडे १ साठी, सेकंड मेन
---
सूचना ः फोटो किमान तीन किंवा चार कॉलमातच घ्यावा....किरटा करू नये.
---
फोटो क्रमांक ः ३५०४१
शिरपूर : ऊस दराची घोषणा करताना आमदार अमरिशभाई पटेल व पदाधिकारी.
---
उसाला ३,४११ रुपयांचा दर जाहीर
शिरपूर साखर कारखान्यातर्फे १६ नोव्हेंबरला मोळीपूजन
---
किंवा
उसाला ३,४११ रुपयांचा दर जाहीर
शिरपूर साखर कारखान्यातर्फे १६ नोव्हेंबरला होणार मोळीपूजन
सकाळ वृत्तसेवा
शिरपूर, ता. १४ : दहिवद (ता. शिरपूर) येथील शिरपूर सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर घेतलेल्या माँ रेवा शुगर्स प्रा. लि.तर्फे २०२६- २०२७ या हंगामासाठी प्रतिटन तीन हजार ४११ रुपयांचा दर जाहीर करण्यात आला आहे. यात ‘शिसाका’च्या साइटवर सोमवारी (ता. १६) मोळीपूजन होणार आहे.
आमदार अमरिशभाई पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (ता. १४) ‘जनक व्हिला‘ येथे माँ रेवा शुगर्स प्रा. लि.चे संचालक, ‘शिसाका’च्या संचालक मंडळाची बैठक झाली. तीत चर्चेअंती रेवा शुगर्सचे संचालक अंकित गोयल यांनी उसाला प्रतिटन तीन हजार ४११ रुपयांचा दर देणार असल्याची घोषणा केली. ‘शिसाका’चे अध्यक्ष माधवराव पाटील, उपाध्यक्ष दिलीप पटेल, महाव्यवस्थापक गणेश यादव, संचालक के. डी. पाटील, वासुदेव देवरे, राहुल रंधे, डी. पी. माळी, धनंजय पाटील, नारायणसिंह चौधरी, संग्रामसिंह राजपूत, भरत पाटील, सुचिता पाटील, प्रकाश चौधरी, अॅड. प्रताप पाटील, शेतकरी राजेंद्र पाटील, जगतसिंह राजपूत, अनिल पाटील आदी उपस्थित होते.
शेतकरी हित जोपासू
आमदार पटेल म्हणाले, की रेवा शुगर्सच्या माध्यमातून साखर कारखाना सुरळीतपणे सुरू राहावा, त्याची भरभराट व्हावी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपले जावे, यासाठी माझे पूर्ण समर्थन व पाठबळ राहील. ‘शिसाका’ने भविष्यात यशस्वी वाटचाल करावी आणि शेतकऱ्यांसह कारखान्याशी संबंधित सर्व घटकांची प्रगती व्हावी, अशा सदिच्छा त्यांनी दिल्या.
सोमवारी मोळीपूजन
‘शिसाका’ साइटवर सोमवारी मोळी पूजनाचा कार्यक्रम होणार आहे. नवचंडी यज्ञ व अन्य विधी केले जातील. लोकप्रतिनिधी, संचालक व शेतकरी उपस्थित राहतील. यापूर्वी २० ऑक्टोबरला आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा आणि अंकित गोयल यांच्या उपस्थितीत ‘शिसाका’त बॉयलर प्रज्वलन करण्यात आले होते. कारखान्याचे महाव्यवस्थापक गणेश यादव यांनी सांगितले, की यंदाच्या हंगामात गळीत प्रक्रिया अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. ऊस उत्पादक शेतकरी आमच्यासाठी महत्त्वाचे घटक असून, ऊसतोडणी, ऊस वाहतूक आणि गळीत प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने, तसेच निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी कारखाना व्यवस्थापन कटिबद्ध आहे.
---
१४-१
चौकट
समारंभ १६ वर्षानंतर...
शिरपूर साखर कारखाना तालुक्याचा आर्थिक कणा म्हणून ओळखला जातो. मात्र २०१० मध्ये थकित कर्जाच्या वसुलीसाठी जिल्हा बँकेने जप्तीची कारवाई केल्यापासून कारखाना बंद होता. दीर्घकाळ बंद राहिल्यामुळे औपचारिक कामांशिवाय तेथे कोणाचीही वर्दळ नव्हती. त्यामुळे हा परिसर ओसाड झाला होता. रेवा शुगर्सकडे भाडेतत्वावर हस्तांतरण झाल्यानंतर ‘शिसाका‘चा परिसर पुन्हा गजबजला. ‘शिसाका’त १६ वर्षांनंतर पुन्हा साखरेचे उत्पादन होणार असून, उसाचे अर्थचक्र गतिमान होणार आहे.