ऊसतोड कामगारांची दिवाळी; कुटुंबापासून दूर राहण्याची वेळ

ऊसतोड कामगारांची दिवाळी; कुटुंबापासून दूर राहण्याची वेळ
Published on: 
ऊसतोड कामगारांची दिवाळी शेतातच यंदाही बहुतांश कामगार घरापासून दूरच सकाळ वृत्तसेवा मालेगाव शहर, ता. ८ : ऊसतोड कामगारांच्या आयुष्यात दिवाळीचे चित्र काहीसे वेगळे असते. पोटाची खळगी भरण्यासाठी गाव सोडून परराज्यात किंवा जिल्ह्याबाहेर गेलेल्या ऊसतोड कामगारांना ऐन दिवाळीतही कुटुंबापासून दूर राहण्याची वेळ आली आहे. हातात कोयता आणि डोक्यावर संसाराचा भार घेऊन ऊसतोड कामगार सणासुदीच्या दिवसांतही शेतात राबत आहेत. माळमाथा परिसरातील अनेक गावांमधून ऊसतोड कामगार मोठ्या प्रमाणावर ऊसतोडीसाठी स्थलांतरीत झाले आहेत.यंदातर दुष्काळी परिस्थिती असल्याने रोजगाराच्या शोधात अनेक कुटुंबांनी दस-यापूर्वी गाव सोडले आहे. ऊसतोडीचा हंगाम सुरू झाल्याने कामगारांच्या दिवसाची सुरुवात पहाटेच होते. दिवसभर ऊस तोडणे, त्याच्या मोळ्या बांधणे आणि वाहतुकीसाठी ऊस तयार करणे. या कामात त्यांचा दिवस संपतो. अशा परिस्थितीत दिवाळीच्या सणासाठी घरी परतणे अनेकांना शक्य होत नाही. परिणामी बहुतांश कुटुंबे ऊसतोडीच्या कोपीतच दिवाळी साजरी करतात. दुष्काळी परिस्थिती, शेतीतील अनिश्चित उत्पन्न आणि स्थानिक पातळीवर रोजगाराच्या मर्यादित संधी यामुळे ऊसतोड कामगारांना स्थलांतराशिवाय पर्याय राहत नाही. दरवर्षी सहा महिने ऊसतोडणीचा हंगाम असतो. यावर्षी पावसामुळे ऊस उत्पादन घटल्याने जानेवारीच्या आत घरी परतावे लागणार आहे. कुटुंबापासून दूर राहून घाम गाळणाऱ्या या कामगारांच्या श्रमांमुळेच अनेकांच्या घरातील चुली पेटतात.दिवाळीच्या प्रकाशात गोरगरीब प्रत्येक घरात पणती तेवत असते. ऊसतोड कामगारांच्या आयुष्यात मात्र कष्टांची धग कायम असते. ---------- कोट गावाकडे दुष्काळ असल्याने ऊसतोड करून रोजी रोटी भागणार आहे. आई वडील गावाकडे आहेत. इच्छा असुनही पोटापुढे काही चालत नाही. त्यामुळे आमची इथंच दिवाळी असते. - कैलास वाघ, बोधे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.