Suhas Kande Receives Dharmabhushan Award in Nandgaon : नांदगाव येथे अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या वतीने 'धर्मभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर आमदार सुहास कांदे यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी अनेक महंत आणि स्थानिक नेते उपस्थित होते.
नांदगाव: आमदार सुहास कांदे यांना अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या नांदगाव शाखेतर्फे धर्मभूषण पुरस्काराचे आज वितरण झाले. येथील श्रीकृष्ण ध्यान मंदिर येथे चक्रधर स्वामींच्या ८०३ व्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात मोठ्या उत्साहात वितरण झाले.