येवल्याच्या राजकीय पटलावर आमदार कांदेच्या एन्ट्रीचे फटाके!

येवल्याच्या राजकीय पटलावर आमदार कांदेच्या एन्ट्रीचे फटाके!
Published on: 
पान-३ साठी--ॲंकर ---------- YEO26B27416 येवला ः नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी येथे लावलेले दिवाळी शुभेच्छांचे फलक. ---------- येवल्यात आमदार कांदेंचा सुतळी बॉम्ब! --------------- शहरासह गावोगावी झळकले दिवाळी शुभेच्छा फलक, राजकीय तर्कवितर्क, कार्यालयही सुरू होणार ------------ सकाळ वृत्तसेवा येवला, ता. ५ : राजकीय घडामोडींमुळे जिल्ह्यात नेहमीच लक्षवेधी ठरणाऱ्या येवल्यात यंदाची दिवाळी वेगळ्याच चर्चेची ठरत आहे. विधानसभेसाठी अनेक जण तयारीत असताना नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्या येथे झालेल्या अनपेक्षित एंन्ट्रीने राजकीय पटलावर सुहास कांदे नावाचे फटाके फुटत आहे. आमदार कांदे यांनी गावोगावी दिवाळीच्या शुभेच्छा देणारे फलक लावले असून प्रमुख पदाधिकारी- कार्यकर्त्यांना मिठाई वाटप करून वेगळाच संदेश दिला आहे. आमदार कांदे याद्वारे येथील राजकीय प्रवेशाची साखर पेरणी करत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ---------------- येवल्याच्या राजकारणात २०२९ ची विधानसभा निवडणूक मागील पाचही निवडणुकांपेक्षा वेगळी ठरणार आहे. यावेळी ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ वाढते वय आणि तब्येतीच्या कारणास्तव निवडणूक लढणार नाही. माजी खासदार समीर भुजबळ जवळपास येथील उमेदवार निश्चित मानले जातात. दुसऱ्या बाजूने युवा नेते कुणाल दराडे हेही रोज मतदारसंघ पिंजून काढत आहेत. आगामी लढत भुजबळ विरुद्ध दराडे अशी होणार अशी चर्चा आहे. ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, युवा नेते सचिन आहेर, भाजपच्या नेत्या अमृता पवार याही बदलत्या राजकीय समीकरणात उमेदवार होऊ शकतात. विधानसभेची रंगीत तालीम भुजबळ, दराडे, शिंदे, आहेर, पवार या नावांच्या भोवती फिरत असतानाच नांदगावचे आमदार कांदे यांनी दिवाळीत येथील राजकीय पटलावर एन्ट्री करून दिवाळीपूर्वीच राजकीय फटाके फोडत सुतळी बॉम्ब लावला आहे. शहरातील विविध प्रमुख चौकात तसेच ग्रामीण भागातील सर्वच गावांमध्ये नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छांचे फलक त्यांनी लावले आहे. सोबतच पक्षाचे व इतर काही प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिवाळीची भेट पाठवली आहे. आमदार कांदे या भूमिकेमुळे राजकीय जाणकाराच्या भुवया उंचावल्या असून इच्छुक नेत्यांमध्येही चलबिचल वाढली आहे. येवल्यातील राजकीय परिस्थितीचा फायदा उचलण्याचे कांदे यांचे बेरजेचे राजकारण असल्याचे सांगितले जाते. सद्यःस्थितीचा विचार करता भुजबळ आणि दराडे यांच्यात मोठा संघर्ष आहे, तसाच संघर्ष भुजबळ व कांदे मध्ये देखील आहे. दुसऱ्या बाजूला एका पक्षात राहून कांदे- दराडे यांच्यातही म्हणावा असा सलोखा नाही. अशा सगळ्या परिस्थितीत आगामी राजकारण कोणत्या दिशेने जाणार याची चर्चा सध्या ऐन दिवाळीत मतदारसंघात सुरू आहे. ---------- कार्यालयातून जनसंपर्क..! दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छांतून जनसंपर्क वाढवला जात असतानाच येथील वर्दळीच्या शनिपटांगण भागात लवकरच आमदार कांदे यांचे जनसंपर्क कार्यालय देखील कार्यान्वित होत आहे. या माध्यमातून नागरिकांचे विविध प्रश्न सोडविले जातील असे त्यांचे समर्थक सांगतात. त्यामुळे कांदेंच्या या नव्या एंट्रीवर मंत्री भुजबळ यांचे समर्थक काय प्रतिक्रिया व्यक्त करतात याची जनसामान्यांमध्ये उत्सुकात वाढली आहे. ----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.