‘Z Plus’ नाकारून एकनाथ शिंदेंना मारण्याचा विचार होता काय? : सुहास कांदें

suhas kande latest marathi news
suhas kande latest marathi newsesakal

नाशिक : गडचिरोलीचे पालकमंत्री असताना आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांना नक्षलवादी मारण्याच्या तयारीत आहेत, असा अहवाल आयबी (IB), एसआयडी (SID), सीआयडीकडून (CID) तत्कालीन गृहमंत्री, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देत ‘झेड प्लस’ सुरक्षा व्यवस्थेचे निर्देश देण्यात आले होते. मात्र ‘वर्षा’ बंगल्यावर फोन गेला, की श्री. शिंदे यांना ‘झेड प्लस’ (Z Plus Security) सुरक्षा देण्यात येऊ नये.

त्यामुळे ‘झेड प्लस’ सुरक्षा नाकारून श्री. शिंदे यांना मारण्याचा विचार होता काय? असा थेट सवाल शिवसेनेतील (Shiv sena) नांदगावचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी शुक्रवारी (ता. २२) येथे उपस्थित केला. (Suhas kande statement to mahavikas aghadi maharashtra political Latest Marathi News)

शिवसंवाद अंतर्गत आदित्य ठाकरे श्री. कांदे यांच्या मतदारसंघातील मनमाडमधील मेळाव्यासाठी निघाले होते. या मेळाव्यात श्री. ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना प्रश्‍न विचारण्याचा निर्णय श्री. कांदे यांनी जाहीर केला होता.

मेळाव्याला जाणाऱ्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना श्री. कांदे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने हिंदुत्वासह शिवसेना संपवण्यासाठी एकनाथ शिंदे यांना ‘टार्गेट' केले होते आणि त्यांना जीवनातून संपवण्यासाठी कट केला होता, असा आरोप केला आहे.

तेंव्हा ‘झेड प्लस’ सुरक्षा नाकारली असताना गृहमंत्री कोण होते? असा प्रश्‍न विचारण्यात आला. त्यावर श्री. कांदे यांनी गृहमंत्री कोण होते, हे आपल्याला माहिती नाही, असे सांगून ‘वर्षा’हून ‘झेड प्लस' सुरक्षा देण्यात येऊ नये, असा फोन गेल्याचे साक्षीदार तत्कालीन गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई आहेत. त्यांच्याकडून याविषयीची आपण खात्री करू शकता, असे स्पष्ट केले.

श्री. शिंदे यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाकारली काय? या पत्रकारांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना श्री. कांदे यांनी ‘मातोश्री’ आमची पंढरी आणि उद्धव ठाकरे आमचे ‘विठोबा माउली’ असल्याचे सांगितले.

सुरक्षा नाकारल्यासंबंधी श्री. शिंदे यांची प्रतिक्रिया काय होती, याविषयी सांगताना श्री. कांदे यांनी आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक असल्याने मी घाबरणार नाही, असे श्री. शिंदे यांनी सांगितले आणि ते घाबरले नसल्याची माहिती दिली.

ते म्हणाले, की ठाण्याचे महापौर आणि शिष्टमंडळ ‘वर्षा’ बंगल्यावर श्री. शिंदे यांना सुरक्षा व्यवस्था द्यावी, असे सांगायला गेले होते. त्या वेळीसुद्धा सुरक्षा नाकारण्यात आली.

suhas kande latest marathi news
धावत्या रेल्वेतून उडी मारलेल्या संशयितांचा मृत्यु

हिंदुत्वविरोधींच्या मांडीला मांडी लावून बसायचे काय?

हिंदुत्वविरोधींच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसायचे काय? असा प्रश्‍न करत श्री. कांदे यांनी एकामागून एक आरोप केले. २६-११ चा बाँबस्फोटामध्ये फाशीची शिक्षा झालेल्या याकूब मेननला फाशी होऊ नये, असे पत्र मुंबईचे तत्कालीन पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले.

तसेच बाँबस्फोट घडवून आणलेल्या दाऊदशी माजी मंत्री नवाब मलिक यांचे संबंध होते. तसेच वीर सावरकरांना ‘माफीवीर’ मुखपत्रातून म्हटले गेले. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख ‘टी बाळू’, असा करत त्यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला (माजी पालकमंत्री छगन भुजबळांचा थेट नामोल्लेख केला नाही) अशांच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसणार नाही.

आम्ही गप्प बसणार नाही. हिंदुत्वावर संकट येते म्हणून उठाव केला जातो, याची शिकवण बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून आम्हाला मिळाली आहे. त्यानुसार आम्ही उठाव केला.

शिवबंधन अन् भगवा न दिसल्याने रडू कोसळले

आम्ही आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. आम्ही बंडखोर नाहीत, असे सांगून श्री. कांदे म्हणाले, की आदित्य ठाकरे यांचा मेळावा झाला. त्या वेळी त्यांच्या दोन्ही हातात शिवबंधन दिसले नाही. भगवा दिसला नाही.

त्यामुळे मला रडू कोसळले. खूप यातना झाल्या. काँग्रेस, राष्ट्रवादीमुळे ते हिंदुत्व विसरले काय? असा प्रश्‍न उपस्थित झाला. माझ्या नांदगाव मतदारसंघातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारुढ पुतळ्यासाठी दहा कोटी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी पाच कोटी, राजमाता जिजाऊ मातांच्या स्मारकासाठी निधी मागितला.

७५० पत्रे दिली. करंजवण पाणी सव्वालाख लोकसंख्येच्या शहराला मिळावे म्हणून ४५ कोटींचा स्वनिधी माफ करा, अशी मागणी केली. त्यासाठी बैठक बोलवा, अशी विनंती केली. मात्र आदित्य ठाकरे यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून नांदगावसाठी काय दिले? हा प्रश्‍न मला त्यांना विचारायचा आहे, असे कांदे म्हणाले.

suhas kande latest marathi news
अवैध मद्यसाठ्यासह ट्रक, 2 कार जप्त; 9 संशयितांना अटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com