वाढत्या कर्जाच्या बोझ्याखाली मनपा कर्मचार्याची आत्महत्या

वाढत्या कर्जाच्या बोझ्याखाली मनपा कर्मचार्याची आत्महत्या
Published on: 
टुडे ४ NSK26H33829 : माधव देशमुख NSK26H33830 : सुसाईड नाेट ---- कर्जाच्या तणावातून मनपा कर्मचाऱ्याची आत्महत्या रामानंदनगरातील घटना; पत्नीला किचनमध्ये पाठवून हॉलमध्ये घेतला गळफास सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २८ : डोक्यावरील कर्ज कसे फेडायचे, या तणावात माधवराव माणिक देशमुख (वय ५६, रा. रामानंदनगर) या गृहस्थाने बुधवारी (ता.२८) राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. व्याज भरुन-भरून त्रासलो (टेंशन) आहे, आता ते शक्य नाही, असे सुसाइड नोटमध्ये नमूद करत देशमुख यांनी जगाचा निरोप घेतला. या घटनेपूर्वी महाबळ येथील गृहस्थाने कर्जाच्या तणावात पाळधीत कंपनी बाहेरच गळफास घेतल्याची घटना ताजीच असतांना आज पुन्हा दुसरी घटना घडली. महापालिकेच्या शाळेमध्ये कर्मचारी असलेले माधवराव देशमुख पत्नी व मुलासह रामानंद नगरमध्ये वास्तव्यास होते. त्यांनी खासगी फायनान्सर (वित्तसंस्था)कडून कर्ज घेतले होते. तसेच इतर खासगी सावकारांसह परिचितांकडून उसनवार रक्कम उचल केली होती. डोक्यावर वाढते कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत ते सतत तणावात होते. मला एकटे सोड... बुधवारी सकाळी माधवराव देशमुख यांनी पत्नीसोबत चहा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्नीला ‘तू काम आवरून घे, मला थोडे एकटे बसू दे’ असे म्हणत ते हॉलमध्ये गेले. त्यांची पत्नी स्वयंपाक करत असताना देशमुख यांनी हॉलमध्येच गळफास घेतला. मग तोडला दरवाजा काही वेळानंतर पत्नी त्यांना बोलवण्यासाठी गेली असता हॉलचा दरवाजा लावलेला होता. आवाज देऊनही प्रतिसाद मिळत नसल्याने घरात झोपलेल्या मुलाला उठवले व शेजारच्यांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी देशमुख हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. गळफास घेताना आवाज येऊ नये, यासाठी देशमुख यांनी तोंडाला रुमाल बांधलेला होता. सुसाईड नोटने उलगडा माधवराव देशमुख यांच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोट मध्ये नमुद केल्या प्रमाणे.. खूप व्याज भरून-भरून टेंशन आले आहे, मला ते आता शक्य नाही. दुसऱ्यांमुळे मी फसलो. व्याजावाले खूप मागे लागतात म्हणून मी हे पाऊल उचलत आहे, असे त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. माधवराव देशमुख हे कर्जाच्या बोझ्यामुळे सतत तणावात राहत होते. त्यामुळे ते परिसरातील नागरिकांना हा माझा शेवटचा महिना आहे, असे सतत सांगत होते. चौकट चार महिने पगाराविनाच... माधवराव देशमुख यांना ४ महिन्यांपासून पगारही मिळालेला नव्हता. त्यामुळे कर्जाचे हप्ते थकले होते. तसेच कर्जापोटी दिलेले दोन धनादेश अनादरीत (बाऊन्स) झाले होते, अशी माहिती त्यांच्या मित्रांनी दिली. २१ लाख रुपये गृहकर्ज घेतलेले होते. त्यासह इतरांचेही पैसे देणे होते. त्यात कर्जाच्या हप्त्याच्या वसुलीसाठी खासगी वित्त संस्थांकडून घरी येऊन तगादा लावला जात होता, अशी माहिती त्यांचा मुलगा ओम देशमुख याने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com