
नवविवाहितेची छळास कंटाळून आत्महत्या; सासरच्या 6 जणांवर गुन्हा दाखल
लखमापूर (जि. नाशिक) : जानोरी येथील माहेर असलेल्या तेवीस वर्षीय नवविवाहिता (Newlywed) दिव्या खोले हिन सासरी होणारा छळ आणि पतीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून विषारी औषध सेवन करीत आत्महत्या (Suicide) केली. नाशिकरोड येथील सासरच्या सहा जणांविरुद्ध दिंडोरी पोलिसात आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Suicide of newlywed wife Case filed against 6 in laws Nashik News)
जानोरी येथील भाऊसाहेब पंढरीनाथ घुमरे यांची मुलगी दिव्या हिचा विवाह वर्षभरापूर्वी नाशिक रोड येथील विजय संजय खोले (रा. खोलेमळा, नाशिक) याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवसातच खोले कुटुंबीयांकडून दिव्या हिस माहेरून घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये आणण्यासाठी छळ सुरू झाला. तिच्या पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती दिव्याला मिळाल्याने खोले कुटुंबियांकडून दिव्याचा वारंवार शारीरिक व मानसिक छळ सुरू झाला. याबाबत दिव्याने माहेरच्यांना वेळोवेळी माहिती दिली, परंतु खोले कुटुंबीयांकडून सातत्याने होणाऱ्या छळास कंटाळून दिव्याने पाच दिवसापूर्वी वडिलांच्या घरी विषारी औषध सेवन केले.
हेही वाचा: सटाणा तालुक्यात पेट्रोल टंचाई; वाहनांच्या लांबच लांब रांगा
तिला घरच्यांनी उपचारासाठी नाशिक येथे दाखल केले होते, परंतु आज सकाळी ती मेडीकल कॉलेज, हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना आज(ता.२५) तिचा मृत्यू झाला होता. वडील भाऊसाहेब पंढरीनाथ घुमरे (रा. जानोरी) यांनी दिव्याच्या सासरच्यांविरुद्ध दिंडोरी पोलिसात आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून दिव्याचा पती विजय संजय खोले, सासू रोहिणी संजय खोले, नणंद वैशाली संजय खोले, गौरी संजय खोले (रा. सर्व खोले मळा, नाशिकरोड) तसेच नणंद दीपाली विकास बोस व नंदोई विकास शिवाजी बोस (रा. जानोरी) या सर्वांविरुद्ध शारीरिक व मानसिक छळ करीत आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पांडुरंग कावळे, सहाय्यक उपनिरीक्षक अरुण आव्हाड, आदी तपास करीत आहेत.
हेही वाचा: Nashik : मालेगावी खेळाडूंचा 'रात्रीस खेळ चाले!'
Web Title: Suicide Of Newlywed Wife Case Filed Against 6 In Laws Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..