Sukene Bypoll Election: सुकेणे सरपंचपदाची पोटनिवडणूक रद्द! अनुसुचित जाती प्रवर्गातील एकाही महिलेचा अर्ज नाही

Election Canceled
Election Canceledesakal

Sukene Bypoll Election : निफाड तालुक्यातील सर्वाधिक लक्षवेधी समजल्या जात असलेल्या मौजे सुकेणे ग्रामपालिकेत सरपंचपदासाठी येत्या १८ मेस मतदान होणार होते.

मात्र, अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असलेल्या सरपंचपदासाठी निर्धारित वेळेत एकही अर्ज न आल्याने ही पोटनिवडणूक किमान सहा महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. (Sukene Bypoll Election for Sarpanch canceled Not single woman from Scheduled Caste category applied nashik news)

गेल्या वर्षभरापूर्वी अविश्‍वास ठराव मंजूर झाल्याने मौजे सुकेणे ग्रामपालिकेत सरपंचपद रिक्त आहे. प्रत्यक्ष जनतेतून निवडले गेलेले सरपंचपद असल्याने जनतेनेच मतदानाद्वारे अविश्‍वास ठराव आणला होता.

तेव्हापासून उपसरपंच सचिन मोगल यांच्याकडे प्रभारी सरपंचपदाचा कार्यभार आहे. आता सरपंचपदाची निवडणूक जाहीर होऊन अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेलाच गावातील एक ते चार प्रभागातील मतदारांना मतदान करण्यात येणार होते.

त्यासाठी १८ मेस मतदान प्रक्रिया घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून चांदोरी येथील मंडळ अधिकारी एन. वाय. कुंदे यांची नेमणूकही जाहीर केली होती.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Election Canceled
Dhule News : अधिकारीच आर्थिक ढिगाऱ्याखाली दबले? महापौरांच्या पाहणीनंतरही महापालिका प्रशासन कुंभकर्णी झोपेत

त्यांना सहकार्यासाठी मौजे सुकेणे येथील तलाठी, ग्रामसेवक व ओझर येथील पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांनी एकत्र येऊन एकच उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक बिनविरोध करावी, असा प्रस्ताव उपसरपंच श्री. मोगल व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी ठेवला होता.

मात्र एकही उमेदवारी अर्ज न आल्याने सरपंचपदाची निवडणूक तूर्त रद्द झाली असून, सहा महिन्यानंतर पुन्हा निवडणूक होण्याची शक्यता आहे.

"मौजे सुकेणे ग्रामपालिकेचे सरपंचपद हे अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव असल्याने इच्छुकांनी एकत्र येऊन सर्वानुमते एकच उमेदवार दिल्यास निवडणूक बिनविरोध होईल असे वाटले होते. परंतु एकही उमेदवारी अर्ज दाखल न केल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे आता निवडणूक रद्द झाली आहे."

-भाऊसाहेब रौंदळ, ग्रामविकास अधिकारी, मौजे सुकेणे.

Election Canceled
Dada Bhuse : ऑगस्टपर्यंत पाणी पुरविण्याचे नियोजन करा : दादा भुसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com