Nashik News : पिंपळगावच्या थोरातांची लेक देवळा ‘नगराध्यक्षपदी’! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Villagers of Pimpalgaon (Va.) congratulating Sulabha Aher on her election as the Municipal President of Nagar Panchayat.

Nashik News : पिंपळगावच्या थोरातांची लेक देवळा ‘नगराध्यक्षपदी’!

पिंपळगाव (जि. नाशिक) : घरातील दैनंदिन व्यवस्थापन अगदी उत्तमरीत्या सांभाळत एखादी 'गृहिणी' घर कुटुंबासह राजकारण व समाजकारणात वेळ देते याचे उत्तम उदाहरण म्हणजे पिंपळगाव (वा.) च्या माहेरवाशीन सुलभा आहेर. विवाहित झाल्यापासून अनेक वर्षे फक्त गृहिणी म्हणून काम सांभाळणाऱ्या सुलभा आहेर यांनी पती जितेंद्र आहेर यांच्या राजकीय पाठबळाच्या आधारे राजकीय क्षेत्रात आपले स्वतःचं वेगळे स्थान निर्माण केले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी सुलभा जितेंद्र आहेर यांची बिनविरोध निवड झाली. "पिंपळगाव (वा.) ची माहेरवशीन देवळ्याची नगराध्यक्षा" अशी प्रतिक्रिया पिंपळगावात उमटली. (sulbha aher from Pimpalgaons elected as Deola city president Nashik News)

देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सुलभा आहेर ह्या पिंपळगाव(वा.) च्या माहेरवाशीन. पिंपळगाव(वा.) येथील कै. संतोष नामदेव थोरात यांच्या त्या कन्या आहेत. सुलभा आहेर यांचे वडील सचिव होते.

लोकहिताचे व समाज सेवेचे बाळकडू सुलभा आहेर यांना वडिलांकडून मिळाले. सुलभा यांचा विवाह १९९७ साली देवळा येथील जितेंद्र आहेर यांच्याशी झाला. विवाहप्रसंगी पती जितेंद्र आहेर हे शरद पवार पतसंस्थेत व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. त्यानंतर जितेंद्र आहेर यांनी राजकीय क्षेत्रात पाऊल टाकले.

सुलभा आहेर यांनी पती जितेंद्र आहेर यांच्या पावलावर पाऊल टाकत राजकारणात प्रवेश केला. नगरपंचायतीच्या निवडणुकीत देवळा नगरपंचायतीत अनुक्रमे प्रभाग ४ व ५ या प्रभागातून सुलभा आहेर व पती जितेंद्र आहेर यांनी विजयश्री खेचून आणत दिमाखदार 'एन्ट्री' करत पती- पत्नी एकाच वेळी निवडून येण्याचा इतिहास घडविला.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

हेही वाचा: Nashik News : मुंबई नाका ते द्वारका चौकांचा श्‍वास कोंडलेलाच! अतिक्रमणातही वाढ!

नगरपंचायतीच्या निवडणुकीत पती पाठोपाठ सुलभा आहेर यांनी खूप कमी वेळात आपली ओळख निर्माण करत समाजातील लोकांना विश्वासात घेत विजय मिळवला. त्यांच्या या गृहिणी ते नगराध्यक्ष पदापर्यंतच्या प्रवासात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे त्यांचे पती अर्थात देवळा नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक जितेंद्र आहेर यांची साथ लाखमोलाची ठरतेय.

सुलभा आहेर यांच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडीबद्दल पिंपळगाव (वा.) येथील गावकऱ्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. सन २०११-१३ या कालावधीत सुलभा आहेर यांनी देवळा ग्रामपालिकेत सरपंच पदाची यशस्वी धुरा सांभाळली आहे.

हेही वाचा: Nashik News : विद्यार्थी आधार कार्ड खरी परीक्षा शिक्षकांची? तांत्रिक अडचणींमुळे रिजेक्ट

टॅग्स :Nashikpresident