Nashik News: तासाभरात वाळणार 50 क्विंटल मका! सुमंगलचा उत्तर महाराष्ट्रातील पहिला मका ड्रायर प्रकल्प कार्यान्वित

Aadhar Baba Ahire, a progressive farmer, while cutting the ribbon for the Maize Dryer Project of Sumangal Industrial Group.
Aadhar Baba Ahire, a progressive farmer, while cutting the ribbon for the Maize Dryer Project of Sumangal Industrial Group.esakal

Nashik News: तालुक्यातील रावळगाव फाटा-बेळगावनजीक असलेल्या सुमंगल उद्योगसमूहाने उत्तर महाराष्टातील पहिला मका ड्रायर प्रकल्प कार्यान्वित केला आहे. जळगाव (गा.) येथील प्रगतिशील शेतकरी आधारबाबा अहिरे यांच्या हस्ते त्याचे उद्‌घाटन करण्यात आले.

या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे सुमारे ५० क्विंटल ओला मका अवघ्या तासाभरात वाळविण्याची त्याची क्षमता असल्याने हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे.

उद्योगसमूहाचे कार्यकारी संचालक श्री. हिरे म्हणाले, की ‘एकच ध्यास- बळीराजाचा विकास’ हे उद्योगसमूहाचे ब्रीद आहे. या विचारानेच आमची वाटचाल सुरू आहे. (Sumangal Industrial Group first maize dryer project in North Maharashtra commissioned nashik news)

तालुक्यासह ‘कसमादे’ परिसरातील शेतकरी, कामगार व नागरिकांचा विश्‍वास व सहकार्यामुळेच यशस्वीपणे मार्गक्रमण सुरू आहे. नव्या प्रकल्पामुळे ओला मका लवकर वाळविला जाईल, यातून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.

उच्च दर व ग्राहकाला चांगल्या दर्जाचा माल मिळेल. मका ड्रायर हा संपूर्ण ऑटोमेशन प्रकल्प आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित असलेले हे यंत्र एका तासात ५० ते ६० क्विंटलपेक्षा अधिक मका वाळविणारे आहे. शेतकरी बांधवांनी मका विक्रीस आणण्यासंदर्भात अनिल पवार (भ्रमणध्वनी ः ९५०३३१७३४०) व प्रशांत गांगुर्डे (९४०३७१०५८३) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. हिरे यांनी केले.

आधारबाबा म्हणाले, की सुमंगल उद्योगसमूहाच्या माध्यमातून संजयअण्णा हिरे यांनी पंचक्रोशीतील बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला. उद्योगसमूहामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मका विक्रीचे हक्काचे ठिकाण निर्माण केले. त्यांनी सुरू केलेला मका ड्रायर प्रकल्पाचा ‘कसमादे’तील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होईल.

Aadhar Baba Ahire, a progressive farmer, while cutting the ribbon for the Maize Dryer Project of Sumangal Industrial Group.
Nashik Agriculture News: उत्पादन घटल्याने मका राहणार तेजीत; गेल्या वर्षाच्या तुलनेने दरात 20 टक्के वाढ

संजयअण्णा शेतकरी हिताचे निर्णय घेत आहेत. कार्यक्रमाला अरुण पवार, वैभव पवार, अरुण दळवी, जितेंद्र अहिरे आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. जितेंद्र आहेर यांनी प्रास्ताविक केले. योगेश पगार यांनी सूत्रसंचालन केले.

अशी होईल मका सुकविण्याची प्रक्रिया

सुमंगल उद्योगसमूहाचे मका ड्रायर युनिट हे अद्ययावत व उच्च मानांकन असलेले युनिट आहे. यात अद्ययावत तंत्रज्ञान वापरून मका ड्राय केला जातो. प्रोसेस करताना मक्यात असलेले नैसर्गिक घटक रंग, प्रोटीन, एनर्जी आदींमध्ये कुठलाही बदल होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.

ड्राय करताना त्यातील पालापाचोळा, बारीक दगड आदी घटक बाजूला करून फक्त मका ड्राय होत आहे. कंट्रोल एन्व्हायरमेंटमध्ये मका पाच टप्प्यांमधून जातो. मक्यातील आर्द्रता ही उष्णता देऊन कमी केली जात आहे. त्यानंतर मका हा वातावरणास तापमानाला थंड करून पॅकिंगसाठी पाठविला जातो. सर्व प्रक्रिया नियंत्रित करण्यासाठी लुधियाना व राजकोट येथील उच्च दर्जाची यंत्रसामग्री वापरण्यात आल्याचे उद्योगसमूहाकडून सांगण्यात आले.

Aadhar Baba Ahire, a progressive farmer, while cutting the ribbon for the Maize Dryer Project of Sumangal Industrial Group.
Nashik Agriculture News: खायदेच्या तात्याराव पवारांनी फुलवली पपईची बाग! किलोला 17 ते 27 रुपये भाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com