जुनी शेमळी- उन्हाच्या काहिलीवर मध्यमवर्गीयांसह गरिबाघरचा 'फ्रीज' असलेले लहान-मोठे माठ बनवून बाजारात विक्रीसाठी आले आहेत. यंदाचा उन्हाळा व्यावसायिकांना मातीच्या वस्तू बनविताना त्रासदायक असला, तरी कडक उन्हाळा या व्यवसायाला उभारी देणारा आहे. .प्रचंड तापमानात भट्टीजवळ काम करणे अवघड बनले आहे. डोक्यावर सूर्य आणि समोर भट्टी आग ओकत असल्याने ऐन विक्री हंगामात घागर, माठ, खापर , बोळकी , पणती, चूल, कुंडी , बनवणे कष्टप्रद बनले आहे. ग्रामीण भागात कुंभार व्यावसायिक सणानिमित व उन्हाळ्यातील गरिबांच्या आवडता फ्रिज अर्थात भाजलेल्या मातीचे माठ बनवतात. .शहरात लहान आकाराचे व ग्रामीण भागात मोठ्या आकाराच्या माठांना मागणी असते २ ते ७ ह डें पाणी माठात भरता येईल असे आकाराचे माठ ३०० ते ७० ० रुपयापर्यत विक्री होते . रसवंतीची दुकाने सर्वत्र थाटली जात असून या व्यावसायिकांकडून मोठ्या माठांना मागणी असते. उन्हाच्या झळा मुळे थंड पाण्याचे आकर्षक वाढत आहे. अडगळीच्या जागी ठेवलेल्या टेबल फॅन, कुलर घराघरात दिवसरात्र फिरायला लागले आहेत.सणानिमित्त पूजेसाठी अथवा घरगुती वापरासाठी लागणाऱ्या मातीच्या वस्तू उन्हाळ्यात बनवितो. गुढीपाडवा व अक्षयतृतीया जवळ येत असल्याने लाल-काळ्या मातीचे माठ, कऱ्हा-केळी, खापर, चूल, बोळकी, कुंडी आदी वस्तू बनविण्यात येत आहेत. जागेवर विक्री होत असल्याने ग्राहकांची मागणी वाढली आहे.-समाधान आहिरे, कुंभार व्यावसायिक.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.