Nampur Newssakal
नाशिक
Nampur News : सुरू आहे उन्हाळा, पशुधन सांभाळा
आग ओकणाऱ्या सूर्याच्या प्रकोपामुळे नागरिकांसह पशु-पक्षी कमालीचे हैराण झाले आहेत.
नामपूर- गेल्या काही दिवसांपासून शहरासह संपूर्ण मोसम खोऱ्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढल्याने उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. आग ओकणाऱ्या सूर्याच्या प्रकोपामुळे नागरिकांसह पशु-पक्षी कमालीचे हैराण झाले आहेत. गॉगल, टोपी, स्कार्फ, रूमाल घेऊनच प्रत्येक जण घराबाहेर पडताना दिसतो. या वाढत्या उष्म्याचा त्रास माणसांप्रमाणेच पशु-पक्ष्यांनाही होत असल्याचे चित्र पाहायला मिळते.
