उन्हामुळे टायर उद्योगाला सुगीचे दिवस; रिमोल्ड टायरकडे वाढतोय कल

Summer is lucky for tire industry Increasing trend towards remold tires Nashik News
Summer is lucky for tire industry Increasing trend towards remold tires Nashik Newsesakal

मालेगाव कॅम्प (जि. नाशिक) : वाढत्या तापमानाचा सर्वच घटकांना फटका बसत असताना टायर उद्योग मात्र त्यास अपवाद ठरतो आहे. उन्हामुळे गाड्यांचे टायर खराब होण्याचे प्रमाण वाढल्याने टायर उद्योगाला सुगीचे दिवस आले आहेत. इंधन दरवाढीमुळे (Fuel price hike) टायरचे दर वाढल्याने त्याचा थेट फटका ग्राहकांना बसत आहे. मध्यमवर्गीयांत स्वस्त रिमोल्ड टायर (Remold Tyre) घेण्याकडे कल वाढतो आहे.

सायकल, दुचाकी, तीन चाकी, कार, प्रवासी व जड वाहतुकीच्या प्रत्येक वाहनाला टायर हा अत्यंत महत्वाचा घटक असतो. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे टायर खराब होणे परवलीचे असताना आता वाढत्या तापमानात टायर माना टाकत आहेत. सध्या चाळीशी पार तापमानामुळे डांबरी रस्ते चटके देत आहेत. उन्हाच्या तडाख्याने टायरची झीज होणे, टायर फुटणे व तडे जाण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रवासी व जड वाहतूक करणाऱ्या वाहनांचे टायर जास्त प्रमाणात खराब होत आहेत. टायर फुटण्याच्या प्रकाराने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. उन्हामुळे ट्यूब पंक्चर होण्याचे प्रमाण तर वाढलेच, सोबतच यापूर्वी काढलेल्या पंक्चरचे ठिगळ वितळत आहे. याचा वाहनधारकांना फटका बसतो आहे.

Summer is lucky for tire industry Increasing trend towards remold tires Nashik News
Ramzan Festival : हलवा पराठ्याची लज्जतच न्यारी!

कारागिरांना रोजगार

रब्बी हंगामाचा अंतिम काळ आणि मॉन्सुनपूर्व मशागतीसाठी भर उन्हाळ्यात शेतीची कामे वेगाने उरकली जातात. ट्रॅक्टर व तत्सम वाहनांचे टायर सुस्थितीत ठेवण्याचा शेतकरी व व्यावसायिकांचा कल असतो. शेती व शेतीपूरक उद्योगातील वाहनांचे टायर बदलण्यासाठी उन्हाळ्याचा मुहूर्त साधला जातो. उन्हाळा हा ऋतू टायर उद्योगासाठी सुगीचा ठरतो. सध्या टायर विक्रीचे शोरून वाहनधारकांच्या गर्दीने फुलले आहेत. उन्हाळ्यात जुने टायर टिकाव धरू शकत नसल्याने नवे टायर खरेदीला प्राधान्य मिळत आहे. टायर शोरूम तसेच पंक्चर काढणाऱ्या कारागिरांकडे गर्दी वाढली आहे. टायर बदलल्यानंतर कार व तत्सम चारचाकी वाहनांचे संरेखन केले जात असल्याने अनुभवी कारागिरांना जादा रोजगार मिळत आहे.

Summer is lucky for tire industry Increasing trend towards remold tires Nashik News
25 वर्षांपासून हातपंप भागवतोय तहान; जलकुंभ मात्र जैसे थे

दरवाढीची कारणे

इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. काळे कार्बन, लोखंड आणि रबर हा कच्चा माल टायर निर्मितीसाठी लागतो. रबराचे अस्थिर उत्पादन, लोखंडाची भाववाढ आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्लॅक कार्बनवर डॉलरचा बोलबाला या कारणांनी टायरचे दर वाढले आहेत.

Summer is lucky for tire industry Increasing trend towards remold tires Nashik News
शाळांना सुटी 2 मेपासून; नवीन शैक्षणिक वर्ष 13 जूनपासून

रिमोल्डचा पर्याय

टायरचे दर आवाक्याबाहेर गेल्याने मध्यमवर्गीय वाहनधारक रिमोल्ड टायरच्या पुनर्वापराला पसंती देत आहेत. रिमोल्डची वाढती मागणी महागाईचे निर्देशक ठरत आहे. दुचाकी व तीन चाकीचे वाहनधारक रिमोल्ड टायर खरेदी करीत आहेत. प्रवासी व व्यावसायिक वाहतुकीच्या वाहनांना रिमोल्ड टायर वापरत नाहीत. मध्यमवर्गीय दुचाकी व रिक्षाचालक मात्र वाहनांसाठीचे जादा टायर रिमोल्ड दर्जाचे वापरतात.

"टायरच्या मागणीत उन्हाळ्यात वाढ असतेच. वाहतूक खर्च वाढल्याने टायरच्या किमती वधारल्या आहेत. टिकाऊ ब्रँडला वाहनधारक अधिक पसंती देतात. त्यामुळे ग्राहकांची गर्दी वाढली आहे."

- अमोल निकम, संचालक, श्री गजानन टायर्स, नामपूर

"रस्त्यांचा दर्जा सुधारल्याने टायरचा घसारा कमी झाला. मात्र, वाढत्या उन्हाने फटका दिला आहे. ट्रान्स्पोर्ट व्यवसायात लग्नसराई व सणासुदीला हंगामी तेजी असते. टोल, इंधन या समस्या असताना आता टायरची दरवाढ अडचणीची ठरत आहे."

- मुन्ना शर्मा, संचालक, हरियाणा रोडलाइन्स, मालेगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com