MahaDBT Scholarship | महाडीबीटी पोर्टलवरील शिष्यवृत्ती अर्ज तत्काळ काढायचे निकाली : सुंदरसिंग वसावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MahaDBT

MahaDBT Scholarship | महाडीबीटी पोर्टलवरील शिष्यवृत्ती अर्ज तत्काळ काढायचे निकाली : सुंदरसिंग वसावे

नाशिक : नाशिक विभागातील शासनमान्य महाविद्यालयांनी महाडीबीटी पोर्टलवर प्राप्त झालेले शिष्यवृत्तीचे अर्ज तत्काळ निकाली काढावेत, असे समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी सांगितले. (Sundar Singh Vasave statement Immediate withdrawal of scholarship application from MahaDBT portal)

ते म्हणाले, की भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेतंर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटीच्या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

केंद्र व राज्य शासनाकडून संयुक्तपणे शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना दिली जाते. शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी त्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज https://mahadbtmahait.gov.in या संकेत स्थळावरून ऑनलाइन पद्धतीने महाविद्यालयात सादर केले आहेत.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

परंतु शिष्यवृत्तीचे अर्ज महाविद्यालयस्तरावर प्रलंबित दिसतात. विद्यार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी महाडीबीटी पोर्टलवरील प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज नियमानुसार योग्य पडताळणी करून लवकर पुढील मंजुरीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग कार्यालयाकडे सादर करावेत.

टॅग्स :NashikScholarshipMahaDBT