नाशिक- काठे गल्लीतील कार्यकर्त्याला बेदम मारहाण आणि घरातील रोकड चोरून नेल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयित व शिवसेना (उबाठा) पक्षातून हकालपट्टी झालेले सुनील बागूल यांच्या अटकपूर्व जामीन अर्जांवरील सुनावणी १४ तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. मंगळवारी (ता.८) याच गुन्ह्यातील संशयित मामा राजवाडे याच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी आहे.