सटाणा: माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी नगरपरिषदेची परवानगी न घेता शहरात प्रत्येक प्रभागातील प्रमुख चौक, देवस्थाने व खासगी मालमत्ता, सरकारी कार्यालयांच्या भिंतींवर पालिका पोस्टर्स व बॅनर्स लावले आहेत. याप्रकरणी महाराष्ट्र मालमत्तेच्या विद्रूपीकरण प्रतिबंध अधिनियमानुसार, मोरे यांच्या विरोधात तत्काळ गुन्हा दाखल करावा, अन्यथा न्यायालयात याचिका दाखल करून नगरपरिषद कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) तर्फे आज देण्यात आला.