NSK26H34967
जळगाव : सम्राट बळीराजा पूजनावेळी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे आदी मान्यवर.
------
दुष्काळी परिस्थितीत शासन शेतकऱ्यांचे सोबत
आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे : सम्राट बळीराजा जयंतीनिमित्त पूजन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.१४ : यंदा राज्यभरात दुष्काळी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांना पाहिजे तसे उत्पन्न नाही, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करणेसाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांनी चक्रवर्ती सम्राट बळीराजा जयंती दिनी आयोजित कार्यक्रमात दिली.
जिल्ह्यात नशामुक्तीबाबत पोलिस प्रशासन करीत असलेल्या कार्याचे कौतुकही त्यांनी केले. जनतेनेही नशामुक्तीसाठी जागृत राहण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ नाट्यकर्मी शंभू पाटील यांनी कार्यक्रमाबाबत चक्रवर्ती सम्राट बळीराजा व वामन यांच्याबद्दल सविस्तर पौराणिक माहिती दिली. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलिस प्रशासन शेतकऱ्यांच्या प्रती मदतीसाठी संवेदनशील असल्याचे सांगितले.
आमदार सुरेश भोळे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी बळीराजा यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी जिजाऊ ब्रिगेडच्या लिना पवार, सुचिता पाटील, अॕड. ललिता चौधरी, मराठा सेवासंघाचे सुरेंद्र पाटील, सुरेश पाटील, राम पवार, सुमित पाटील, प्रमोद पाटील, खुशाल चव्हाण, हिरामण चव्हाण, चंद्रकांत देसले, सचिन पाटील, ग. स. सोसायटीचे संचालक उदय पाटील, साहेबराव पाटील, बहुजन जनक्रांतीचे मुकुंद सपकाळे आदी उपस्थित होते.
------