धुळे : टुडे पान २ साठी...
---
फोटो क्रमांक : 34891
अंबोडे (ता. धुळे) : कन्हेरी नाल्याच्या पुरात पिता-पुत्र गमावलेल्या रत्नाबाई पारखे यांना भाऊबीजेच्या निमित्ताने मदत सुपूर्द करताना उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, प्रफुल्ल पाटील.
---
अंबोडेतील पारखे कुटुंबाला
आर्थिक मदतीचा आधार
पालकमंत्री रावलासह उपमहापौर पाटलांकडून मदत
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १२ : अतिवृष्टीमुळे कन्हेरी नाल्याच्या पुरात अंबोडे (ता. धुळे) येथील पिता-पुत्रांचा दुर्दैवी मृत्यू झालेल्या पारखे कुटुंबाला सामाजिक स्तरावरून आधार मिळाला आहे. ३१ जुलै २०२६ ला अंबोडे येथील आनंदा भागवत पारखे आणि त्यांचा मुलगा नितीन आनंदा पारखे हे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने जागीच मृत्यू पावल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.
या प्रसंगात रत्नाबाई आनंदा पारखे यांना साहाय्य करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी आर्थिक मदत जाहीर केली. दरम्यान दिवंगत आनंदा पारखे यांचे निकटवर्तीय असलेले प्रफुल्ल पाटील यांच्या पत्नी तथा महापालिकेच्या उपमहापौर ज्योत्स्ना पाटील यांनी त्यांचे एक महिन्याचे संपूर्ण मानधन भाऊबीजेच्या निमित्ताने थेट रत्नाबाई पारखे यांच्याकडे सुपूर्द केले. या वेळी प्रफुल्ल पाटील, उपमहापौर पाटील यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन कुटुंबाची विचारपूस केली. या संवेदनशील मदतीमुळे दुःखात सापडलेल्या पारखे कुटुंबाला आधार मिळाला.