प्राथमिक पदवीधर शिक्षकांचा सर्वोच्च न्यायालयात विजय : राज्य शासनाची विशेष अनुमती याचिका फेटाळली; दहा वर्षांच्या संघर्षाला यश

प्राथमिक पदवीधर शिक्षकांचा सर्वोच्च न्यायालयात विजय : राज्य शासनाची विशेष अनुमती याचिका फेटाळली; दहा वर्षांच्या संघर्षाला यश
Published on: 
शिक्षकांच्या वेतनश्रेणीचा लढा सर्वोच्च न्यायालयात यशस्वी शासनाची याचिका फेटाळली; प्राथमिक पदवीधर व विषय शिक्षकांना दिलासा सकाळ वृत्तसेवा मालेगाव शहर, ता. १८ : राज्यातील प्राथमिक पदवीधर व विषय शिक्षकांच्या वेतनश्रेणीसंदर्भातील न्यायालयीन लढ्यात शिक्षकांना महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. नागपूर खंडपीठाने ८ मे २०२६ रोजी दिलेल्या निकालाविरोधात शासनाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली विशेष अनुमती याचिका (एसएलपी) बुधवारी (ता. १८) फेटाळण्यात आली. यामुळे शिक्षकांच्या वेतनश्रेणीच्या मागणीला बळ मिळाले असल्याची माहिती देवेंद्र बारगजे यांनी दिली. प्राथमिक पदवीधर व विषय शिक्षकांना न्याय्य वेतनश्रेणी मिळावी, यासाठी गेल्या दहा वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. शासनाच्या निर्णयाविरोधात शिक्षकांनी न्यायालयीन लढा उभारला होता. नागपूर खंडपीठाच्या निकालानंतरही शासनाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळल्याने या प्रकरणात शिक्षकांच्या बाजूने महत्त्वपूर्ण घडामोड घडली आहे. या लढ्यात विषय शिक्षक वेतनश्रेणी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक संजय लोणारे (गडचिरोली) आणि देवेंद्र बारगजे (जालना) यांनी संघटन व पाठपुराव्याची जबाबदारी सांभाळली. तसेच चार जिल्ह्यांतील शिक्षक, संघटनेचे पदाधिकारी आणि न्यायालयीन प्रक्रियेत सहकार्य करणाऱ्या अधिवक्त्यांचे योगदान राहिले. न्यायालयीन लढ्यात ॲड. प्रदीप क्षीरसागर, ॲड. पोखरीयाल आणि ॲड. अमोल सूर्यवंशी यांनी बाजू मांडली. याचिकाकर्त्यांमध्ये संजय लोणारे, गणेश आसेकर (चंद्रपूर), नंदू सुसर, बाहेकार, नावकार (बुलढाणा) आणि संदीप तंबाखे (यवतमाळ) यांचा समावेश होता. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व पात्र शिक्षकांना संबंधित वेतनश्रेणीचा लाभ मिळण्यासाठी शासनाने आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा शिक्षकांकडून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.