झेप ‘ती’च्या कर्तृत्वाची : लोगो घ्यावा
-------------------------------
फोटो - NSK26H33132
नामपूर : महिलांच्या आरोग्याबाबत केलेल्या कामाबद्दल ग्रामपंचायतीतर्फे पुरस्कार स्वीकारताना सुरेखा खैरनार.
आशासेविका सुरेखा खैरनारांनी
आरोग्यसेवेसह जपली बांधीलकी
प्रशांत बैरागी : सकाळ वृत्तसेवा
नामपूर, ता. २० : महिलांच्या आरोग्यविषयक समस्या समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, आरोग्यसेवांचा लाभ मिळवून देणे आणि आरोग्याबाबत जनजागृती करणे, ही काळाची गरज बनली आहे. अशा परिस्थितीत कर्तव्यदक्ष आशा सेविका सुरेखा खैरनार यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठ कार्यातून महिलांच्या आरोग्यसेवेत मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे त्या परिसरातील महिलांसाठी विश्वासार्ह आरोग्यदूत ठरल्या आहेत.
ग्रामीण भागातील महिलांना आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आरोग्यविषयक माहितीचा अभाव, वेळेवर उपचार न मिळणे, गर्भवती महिलांची काळजी, माता-बाल आरोग्य आणि नियमित आरोग्य तपासणी यांसारख्या बाबींमध्ये मार्गदर्शनाची आवश्यकता असते. अशा वेळी आशा कर्मचारी या आरोग्य यंत्रणेतील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतात. सुरेखा खैरनार यांनीही महिलांपर्यंत आरोग्यविषयक माहिती पोहोचविणे आणि त्यांना आवश्यक आरोग्यसेवांकडे प्रवृत्त करणे, या कामाला प्राधान्य दिले आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामात केवळ शासकीय जबाबदारी पार पाडणे एवढाच उद्देश नसतो, तर नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करून त्यांना आरोग्याच्या मुख्य प्रवाहात आणणेही तितकेच महत्त्वाचे असते. सुरेखा खैरनार यांचे कार्य हे महिलांच्या आरोग्याबाबत संवेदनशीलता, सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व अधोरेखित करणारे आहे. ग्रामीण आरोग्य व्यवस्थेत आशा कर्मचाऱ्यांची भूमिका किती मोलाची आहे, याची जाणीव त्यांच्या कार्यातून होते. महिलांचे आरोग्य सुदृढ राहावे, कुटुंबामध्ये आरोग्याविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा आणि गरजू महिलांना योग्य वेळी मार्गदर्शन मिळावे, यासाठी अशा कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे ठरते.
महिलांच्या आरोग्यसेवेसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या आशा कर्मचाऱ्यांचा गौरव म्हणजे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेच्या पाठीशी उभ्या असलेल्या सेवाव्रती हातांचा सन्मान होय. सुरेखा खैरनार यांच्यासारख्या कर्मचाऱ्यांच्या कार्यामुळे आरोग्यसेवा अधिक लोकाभिमुख होण्यास मदत मिळते. महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांचे योगदान निश्चितच प्रेरणादायी आहे. महिलांच्या आरोग्यासोबतच सुरेखा खैरनार यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक लोकोपयोगी कामे त्यांनी केली आहेत. सामाजिक कार्याची आवड असल्याने नामपूर ग्रामपंचायत सदस्य, इंदिरा काँग्रेसचे महिला तालुकाध्यक्ष आदी पदांवर त्यांनी कामकाज केले असून त्यांच्यातील नेतृत्व गुणांमुळे आयटक कामगार युनियनचे कॉम्रेड राजू देसले यांच्या मार्गदर्शनाखाली आशा आणि गट प्रवर्तक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा त्या सांभाळत असून आशा सेविकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शासनाकडे त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
कोट...
महिलांशी संवाद साधताना त्यांच्या अडचणी समजून घेणे, आरोग्यविषयक प्रश्नांबाबत योग्य माहिती देणे आणि आवश्यकतेनुसार आरोग्य केंद्रातील सेवा घेण्यासाठी प्रोत्साहित करणे, अशा कामांमुळे आरोग्यसेवांबाबत जागरूकता वाढण्यास मदत होते.
- सुरेखा खैरनार, नामपूर (फोटो -