सुरगाण्यातील हॉटेलमधील जुगार अड्ड्यावर छापा

सुरगाण्यातील हॉटेलमधील जुगार अड्ड्यावर छापा
Published on: 
सुरगाण्यात हॉटेलमधील जुगारअड्ड्यावर छापा तब्बल ७३ लाखांच्या मुद्देमालासह १६ जुगारी ताब्यात सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ५ : सुरगाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बर्डीपाडा गाव येथील हॉटेल एन. जी. हिल्सच्या मोकळ्या जागेत सुरू असलेल्या तीन पत्ती जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत गुजरात आणि स्थानिक भागातील मिळून एकूण १६ जुगाऱ्यांना पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून रोकडसह तब्बल ७३ लाख दोन हजार ३७० रुपयांचा ऐवज जप्त केला. हॉटेल एन.जी. हिल्सच्या मोकळ्या जागेत काही व्यक्ती स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी तीन पत्ती जुगार खेळत व खेळवत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने घटनास्थळी जाऊन छापा टाकला. त्या वेळी जुगार खेळणाऱ्या १६ जुगाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी सुरगाणा पोलिसांत गुन्हा दाखल झाला. श्याम पवार (वय ३९, रा. दवाखानापाडा, सुरगाणा), विजयभाई उकाळे (३९, रा. सुरत, गुजरात), जिग्नेशभाई सावलिया (३५, रा. सुरत), राधाकृष्ण दुबे (४९, रा. वापी, जि. वलसाड, गुजरात), अनुराग शहा (२५, रा. नवसारी, गुजरात), केशव वसावा (४९, रा. सुरत), यश चोटलिया (२२, रा. सिल्वासा, दादरा नगर हवेली), साजिदभाई शेख (३३, रा. नानापोंडा, ता. पार्डी, जि. वलसाड), जितेंद्र गिरी (४३, रा. सरीगाम, ता. उंबरगाम, जि. वलसाड), अश्विन शहा (४१, रा. मोगरावाडी, जि. वलसाड), गुलाम मोहिउद्दीन अब्दुल मन्सुरी (६०, रा. सुरत), हितेश पटेल (४२, रा. कतारगाम, सुरत), साहिब शेख (५०, रा. बेगमपुरा, सुरत), अब्दुल जुबेर रफिक शेख (३६, रा. बेगमपुरा, सुरत), मुस्ताक शेख रफोद्दीन (५८, रा. उमरवाडा, सुरत), आरिफ शकील शेख (४७, रा. नवसारी बजार, सुरत) यांना पकडण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com