Surya Kiran Aerobatic Team air show
Sakal
नाशिक: भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण ॲरोबॅटिक साहसी पथकातर्फे गुरुवारी (ता. २२) गंगापूर धरण परिसरात सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत हवाई कसरतींचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या हवाई कसरतींसाठी यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी धरण परिसरात बुधवारी (ता. २१) पाहणी केली. तसेच तयारीसंदर्भात सूचनाही केल्या.