Nashik Crime News : चाळीसगावमधून संशयित भोंदूबाबास अटक; दोषीला कठोर शिक्षा देण्याची ग्रामस्थांची मागणी

 arrested
arrested esakal

Nashik Crime News : पिंपळकोठे (ता. बागलाण) येथील तरुणाच्या खूनप्रकरणी सहा दिवसापासून फरार असलेल्या संशयित भोंदूबाबाला अटक करण्यात नाशिक ग्रामीण पोलिस पथकाला यश आले आहे.

संशयित भोंदूबाबा तुळशीराम बुधा सोनवणे यास पथकाने गुरुवारी (ता.२०) पहाटे चाळीसगाव येथून अटक केली. त्याला शुक्रवारी (ता.२१) सटाणा न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती जायखेडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांनी दिली. (Suspect Bhondubaba arrested from Chalisgaon Villagers demand severe punishment for guilty Nashik Crime News)

पिंपळकोठे येथील मृत प्रवीण गुलचंद सोनवणे हा आजारी असल्याने तो आलियाबाद (ता. बागलाण) येथील ओळखीच्या निंबा सोनवणे याच्याकडे (भोंदूबाबा) उपचारासाठी येत असे. मागील दहा दिवसांपूर्वी प्रवीण हा या गावठी उपचार घेण्यासाठी आला असता.

चार ते पाच दिवस उलटूनही तो परत घरी आला नव्हता. म्हणून त्याच्या घरच्यांनी बाबांशी संपर्क साधत प्रवीणची विचारपूस केली असता बाबा प्रत्येक वेळेस उडवाउडवीचे उत्तरे देत होते.

बाबाचे घर हे वस्तीत एकांतात असल्याने व गावातील लोक कामासाठी बाहेर जात असल्याने घराकडे कुणी फिरकत नसे. गावातील भीमाबाई आणि मोतीराम सोनवणे यांना बाबाच्या घराजवळून दुर्गंधी आणि निळा माश्‍या फिरत असल्याचे दिसल्याने त्यांनी याबाबत पोलिस पाटील यांना माहिती दिली.

पोलिस पाटील शिवाजी जगताप यांनी याबाबत जायखेडा पोलिस ठाण्यात माहिती दिली असता पोलिसांनी बाबाच्या घराची तपासणी केली असता त्यांना प्रवीणचा मृतदेह मिळून आला.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

 arrested
Jalgaon Fraud Crime : बिझनेस लोनच्या नावे गंडविणाऱ्यास अटक

अंधश्रद्धेच्या नावाखाली पैसे पाडणे साठी किंवा इतर दुसऱ्या कारणासाठी अघोरी विद्या करून प्रवीणचा गळा दाबून खून केल्याची चर्चा आहे. या घटनेनंतर मृत प्रवीणचे वडील गुलचंद सोनवणे यांनी याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलिस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. शिरसाट,

सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय वाघमारे, नवनाथ रसाळ, हवालदार सुनील पाटील, गोपीनाथ भोये, योगेश क्षीरसागर, पृथ्वीराज बारगळ, शरद भगरे, अरविंद ढवळे, तुषार मोरे आदी यांनी नाशिक, धुळे, जळगाव आणि गुजरात याठिकाणी संशयित याचा शोध घेण्यास सुरवात केली.

यावेळी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार संशयित भोंदूबाबा हा चाळीसगाव येथे असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी गुरुवारी (ता.२०) पहाटे संशयित तुळशीराम सोनवणे यास सापळा रचून अटक केली.

संशयितास कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी गुलचंद सोनवणे, देविदास भामरे, भाऊसाहेब भामरे, रवींद्र भामरे, विश्वास भामरे, सतीश सोनवणे, लालचंद सोनवणे, रवींद्र सोनवणे यांनी केली आहे.

 arrested
Kolhapur Crime News: दोनशे रुपयांच्या उधारीसाठी एकाचा खून

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com