
Nashik Crime News : विनयभंग करणाऱ्या संशयितास अटक
जुने नाशिक : अल्पवयीन तरुणीचा विनयभंग करून फरारी संशयितास भद्रकाली गुन्हे (Crime) शोध पथकाने ताब्यात घेतले. (suspect who molested minor girl was arrested by Bhadrakali Crime Investigation Team nashik crime news)
गेल्या १३ दिवसापासून संशयित फरार होता. तक्रारदार अल्पवयीन तरुणी शनिवारी (ता. ४) शालिमार संदर्भ रुग्णालय प्रवेशद्वारावर बसची वाट पाहत थांबली असताना संशयित अली मेहबूब शेख (१९, रा. भालेकर मैदानाजवळ ) याने विनयभंग केला होता.
भद्रकाली गुन्हे शोध पथकाचे पथकाचे नाईक विशाल काठे यांना संशयित द्वारका परिसरात येत असल्याची माहिती मिळाली.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे सहाय्यक निरीक्षक किशोर खांडवी कर्मचारी संदीप शेळके, विशाल काठे, श्री. भांबरे, संजय पोटिंदे यांनी त्यास सापळा रचून ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. सोनवणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.